Wipro Job Hiring: विप्रोमध्ये मोठी नोकर भरती; 10 हजार ते 12 हजार नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार
गेल्या दोन आर्थिक वर्षांत या आयटी सेवा कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट नोंदवली असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Wipro Job Hiring: विप्रो 2025 च्या (Wipro job)आर्थिक वर्षात 10 हजार ते 12 हजार नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांत या आयटी सेवा कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट नोंदवली असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत, विप्रोने 3,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हेडकाउंटमध्ये सलग सहा तिमाहीत घट झाल्यानंतर या तिमाहीत 337 कर्मचाऱ्यांची वाढ नोंदवली गेली. (हेही वाचा:BMW Sales Increased In India:2024 च्या पहिल्या सहामाहीत BMW Group India ची भारतात आतापर्यंतची सर्वाधिक कमाई; 7,098 युनिट्सची विक्री )
कंपनी पुढील आर्थिक वर्षात (FY26) 10 हजार ते 12 हजार कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. विप्रोचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी 19 जुलै रोजी कंपनीच्या Q1 कमाईच्या कॉन्फरन्स कॉल दरम्यान सांगितले की, 'आम्ही एका वर्षानंतर पुन्हा भर्ती बाजारात परतलो आहोत.' गोविल पुढे म्हणाले की विप्रो FY25 मध्ये दिलेल्या सर्व जॉब ऑफर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे.
ते म्हणाले, 'काही संस्थांसोबत आमचे संबंध आणि भागीदारी मजबूत केली आहे. त्यामुळे आम्ही या वर्षी कॅम्पसमध्ये आणि कॅम्पसबाहेर भरती करू. पुढच्या वर्षीही तितक्याच लोकांना नोकरी देण्याची आमची योजना आहे. आम्ही आमची क्षमता वाढवत आहोत. आमच्या पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ आहे.' (हेही वाचा:Bajaj CNG Bike Freedom 125: बजाजने लाँच केली जगातील पहिली सीएनजी बाईक फ्रीडम 125; जाणून घ्या किंमत व फीचर्स )
टीसीएस, एचसीएल टेक आणि इनफोसीस सारख्या इतर आयटी कंपन्या देखील मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा विचारात आहेत. पहिल्या तिमाहीत, विप्रोच्या संलग्न कंपन्यांमध्ये, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने 11,000 नवीन कर्मचारी नियुक्त केले आणि LTIMindtree ने 1,400 नवीन कर्मचारी नियुक्त केले.
FY25 मध्ये, टीसीएस 40,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे, एचसीएल टेक 10,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे आणि इनफोसीस 15,000-20,000 नवीन कर्मचारी नियुक्त करेल.
विप्रोने 19 जुलै रोजी पहिल्या तिमाहीची कमाई जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत निव्वळ नफा 4.6 टक्क्यांनी वाढून 3,003 कोटी रुपये झाला आहे. आयटी कंपनीचा एप्रिल-जून एकत्रित महसूल 3.8 टक्क्यांनी घसरून 21,964 कोटी रुपयांवर आला आहे.