Benelli कंपनीची 'ही' आहे भारतातील सर्वात स्वस्त बाइक; फक्त 6000 रुपयांत करू शकता बुकिंग
Benelli Leoncino 250 हे या नव्या मॉडेलचं नाव आहे व सध्या ही बाइक व्हाइट, ग्रे, रेड आणि ब्राउन अशा चार रांगांमध्ये उपलब्ध आहे.
बेनेली इंडिया या ब्रँडने नुकतीच भारतात त्यांची एक नवी बाईक लाँच केली. या बाईकची खासियत म्हणजे ही कंपनीची भारतातील सर्वात स्वस्त बाईक आहे. 2.5 लाख रुपये इतकी याची एक्स-शोरूम किंमत असून ती 6,000 रुपयांमध्ये बेनेलीच्या अधिकृत संकेतस्थळावरून त्याची बुकिंग करता येऊ शकते.
Benelli Leoncino 250 हे या नव्या मॉडेलचं नाव आहे व सध्या ही बाइक व्हाइट, ग्रे, रेड आणि ब्राउन अशा चार रांगांमध्ये उपलब्ध आहे.
या बाईकची वैशिट्य म्हणजे या बाइकमध्ये 249CC क्षमतेचं सिंगल-सिलिंडर लिक्विड कूल्ड मोटर इंजिन असणार आहे. हे इंजिन 25.8 hp ची ऊर्जा आणि 21.2 Nm टॉर्क निर्माण करू शकतं. तसेच या बाइकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स देखील आहेत.
या बाईकसोबत ३ वर्षांची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी देखील मिळते. तसेच कंपनीने या बाईकला ‘नेक्ड स्ट्रीट लूक’ देण्याचा प्रयत्न केला आहे.