Bajaj Chetak Electric स्कूटर लॉन्च, किंमत 1 लाखापासून सुरु
याची सुरुवाती किंमत 1 लाख रुपये आहे. ही स्कुटर दोन वेरियंट मध्ये ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक चेतक एकदा फुल चार्ज केल्यानंतर 95 किमी धावणार आहे.
बजाज कंपनीने मंगळवारी चेतक इलेक्ट्रिक (Bajaj Chetak Electric) स्कुटर लॉन्च केली आहे. याची सुरुवाती किंमत 1 लाख रुपये आहे. ही स्कुटर दोन वेरियंट मध्ये ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक चेतक एकदा फुल चार्ज केल्यानंतर 95 किमी धावणार आहे.रेट्रो-मॉर्डन लुक असलेली ही स्कुटर प्रिमियम पद्धतीची दिसून येत आहे. चेतकची ही स्कुटर 1 लाख रुपयांपासून सुरु असून त्याच्या प्रिमियअम अॅडिशनसाठी 1.15 लाख रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.
चेतक ही इलेक्ट्रिक रेट्रो स्टायलिंग असलेली स्कुटर आहे. याचा लूक दमदमार असून यासाठी सॉलिड स्टील फ्रेम आणि हार्ड शीट मेटल बॉडीचा वापर केला आहे. स्कुटरमध्ये एलईडी हेडलाईट, एलईडी डेटाइम रनिंग लाईट्स आणि फुल-डिजिटल उपकरणांचे पॅनल दिले आहेत. स्कुटरच्या दोन्ही बाजूला 12 इंचाचे अलॉय वील्ज आहेत. त्याचसोबत इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिवर्स गिअरचा सुद्धा ऑप्शन देण्यात आला आहे. तसेच 3kWh लिथियम आर्यन बॅटरी पॅक देण्यात आले आहे.(पेट्रोलशिवाय चक्क 300 किलोमीटर धावणारी Tata Nexon इलेक्ट्रिक SUV कार लवकरच होणार लॉन्च)
स्कुटरच्या बॅटरीबाबत अधिक बोलायचे झाल्यास ती स्वॅप करता येणार नाही आहे. मात्र घरी असलेल्या 15A पॉवर सॉकेटच्या मदतीने चार्ज करता येणार आहे. स्कुटर 1 तासात 25 टक्के आणि 5 तासात फुल चार्ज होणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, फुल चार्ज केल्यानंतर चेतक इलेक्ट्रिक 95 किमी दूरवर धावणार आहे. बजाज ऑटो या स्कूटर सोबत चार्जर सुद्धा ग्राहकांना देणार आहे. स्कुटरवर 3 वर्षांची वॉरंटी आणि 3 फ्री सर्विस मिळणार आहे.