US: वायुदलाच्या एअर शो दरम्यान दोन लष्करी लढाऊ विमानं एकमेकांवर आदळली, अपघातात सहा जणांचा मृत्यू
अपघाताचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असुन यांत दोन्ही विमाने वेगाने खाली येण्यापूर्वी हवेत एकमेकांवर आदळताना दिसत आहेत, ज्यामुळे मोठी आग लागली आणि काळ्या धुराचे लोट उठले.
अमेरीकेत भव्य दिव्य प्रिमिअर वल्ड वॉर २ एअर शो आयोजित करण्यात आला होता. उत्साह आणि आनंदाचा क्षण असताना विरजन पडावी अशी दुखद घटना अमेरीकेत घडली आहे. टेक्सास येथे एअरशो दरम्यान दोन लढाऊ विमान एकमेकांवर आदळले असुन या भीषण अपघाता दरम्यान सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या शोमध्ये ४० हुन अधिक फायटर जेटची समावेश होता. तरी दरम्यान बी १७ आणि पी ६३ ही दोन विमान एकमेकांवर आदळून हा अपघात झाल्याची माहिती अमेरीकन हवाई दलाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे. या क्रॅश दरम्यान बी १७ मध्ये ५ आणि पी ६३ मध्ये १ असा सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. या अपघाताचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हारल होत असुन यांत न्ही विमाने वेगाने खाली येण्यापूर्वी हवेत एकमेकांवर आदळताना दिसत आहेत, ज्यामुळे मोठी आग लागली आणि काळ्या धुराचे लोट उठले.
या अपघाताचा तपास करण्यासाठी यूएस सरकारी (US Government) तपास एजन्सीने विशेष गो-टीम (Go Team) स्थापन करण्यात आली आहे. ही संपूर्ण टीम घडलेल्या अपघाताचं सखोल परिषण करुन हा अपघात घडण्यामागील नेमक कारण काय ह्याचा छडा लावणार आहे. मायकेल ग्रॅहम यांनी या विषयीची माहिती प्रसार (Media) माध्यमांना दिली आहे. (हे ही वाचा:- Maldives मध्ये विदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना भीषण आग, 9 भारतीयांचा मृत्यू; Embassy कडून हेल्पलाईन नंबर्स जारी)
B-17 हे एक प्रचंड चार इंजिन बॉम्बर आहे आणि दुसऱ्या महायुद्धात (World War 2) यूएस हवाई शक्तीचा आधारस्तंभ होता. दुसरे महायुद्ध संपल्यावर बहुतांश B-17 रद्द करण्यात आले होते. अशी माहिती अमेरीकेच्या प्रसार माध्यमांकडून देण्यात आली आहे. तरी संपूर्ण सखोल तपासानंतरच अपघात नेमका कसा झाला ही माहिती पुढे येईल.