फिलिपिन्स येथे दशहतवाद्यांचा धुमाकूळ, चर्चमध्ये घडवलेल्या बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू
दक्षिण फिलिपिन्स (Philippine) येथे दहशतवाद्यांनी एका द्विपावरच्या चर्चवर निशाणा साधून बॉम्बस्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे
दक्षिण फिलिपिन्स (Philippine) येथे दहशतवाद्यांनी एका द्विपावरच्या चर्चवर निशाणा साधून बॉम्बस्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू असून अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
दक्षिण फिलिपिन्स येथे दहशतवाद्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तर काही दिवसांपूर्वी या भागात मुस्लिम प्रांत व्हावे यासाठी लोकांनी मतदान केले होते. बॉम्बस्फोट घडवून आणलेल्या कॅथेड्रल चर्च विचित्र पद्धतीने जळून खाक झाले आहे. तसेच चर्चमध्ये एक बैठक सुरु होती त्यावेळी दहशतवाद्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला. चर्चच्या बाहेरील बाजूसही दहशतवाद्यांनी धुमाकुळ घालवत बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या हल्ल्यामध्ये 5 सैनिक, तटरक्षक दलाचा एक जवान आणि 18 जाणांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी राष्ट्रपतींचे प्रवक्ते सल्वाडोर पनेलो यांनी बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद्यांचा लवकरच तपास करुन त्यांना कैद करणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. तर बॉम्बस्फोट हल्ल्यातील दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही असे ही पनेलो यांनी म्हटले आहे. तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात दहशतवादी संघटना इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे.