Tomato Price Hike in Pakistan: पाकिस्तानला महागाईचा फटका! ईदपूर्वी टोमॅटोचे दर 200 रुपये किलो

एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, ईद-उल-अजहापूर्वी एका दिवसात पाकिस्तानमध्ये टोमॅटोच्या किंमतीत 200 पाकिस्तानी रुपये प्रति किलोग्रॅमने वाढ झाली आहे. तर जिल्हा सरकारने 100 पाकिस्तानी रुपये प्रति किलोग्राम किंमत मर्यादा निश्चित केली आहे.

Tomato | Representational image (Photo Credits: pxhere)

Tomato Price Hike in Pakistan: पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईचा मोठा धक्का बसला आहे. एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, ईद-उल-अजहापूर्वी एका दिवसात पाकिस्तानमध्ये टोमॅटोच्या किंमतीत 200 पाकिस्तानी रुपये प्रति किलोग्रॅमने वाढ झाली आहे. तर जिल्हा सरकारने 100 पाकिस्तानी रुपये प्रति किलोग्राम किंमत मर्यादा निश्चित केली आहे. सरकारच्या कडक धोरणानंतरही पाकिस्तानमध्ये टोमॅटोचे भाव दुपटीने वाढले आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर पेशावरच्या उपायुक्तांनी अनोखे पाऊल उचलले आहे. जेणेकरून टोमॅटोचे वाढलेले भाव रोखता येतील. त्यामुळेच प्रशासनाने विक्रेत्यांना  पेशावरबाहेर काढण्यासाठी कलम 144 लागू करून कारवाई केली आहे.

खरं तर, ईद-उल-अझाच्या एक दिवस आधी, स्थानिक किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव दुप्पट झाले आहेत, जे पूर्वीच्या अंदाजानुसार आहे. ईद-उल-अजहा अर्थात बकरीपूर्वी पाकिस्तानमध्ये टोमॅटोच्या किमती वाढल्याने लोकांनी निराशा व्यक्त केली आहे.