ताइवान बनला पहिला आशियाई देश जेथे समलैंगिक विवाहाला मिळाली मंजुरी

ताइवान (Taiwan) मध्ये समलैंगिक विवाहाला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

ताइवान बनला पहिला आशियाई देश जेथे समलैंगिक विवाहाला मिळाली मंजुरी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

ताइवान (Taiwan) मध्ये समलैंगिक विवाहाला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे समलैंगिकतेच्या बाबत ताइवान हा पहिला आशियाई देश बनला असल्याचे म्हटले जात आहे. या समलैंगिक विवाहाला संसद भवनाने आज (17 मे) मंजूरी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अलजजीरा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ताइवान येथील समलैंगिक जोडप्यांसाठी निवारक स्थायी संघ (Exclusive Permanent Unions) आणि सरकारी कार्यलयात समलैंगिक विवाहाचे रजिस्ट्रेशन करण्याच्या अर्जाला मंजुरी देणारा कायदा पास केला आहे. यापूर्वी समलैंगिक विवाहाचा कायदा पास होण्यासाठी 24 मे पर्यंतचा कालावधी दिला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात राजधानी ताइपे (Taipei) येथील संसद भवनाबाहेर भर पावसातस या कायद्यासाठी मतदान व्हावे यासाठी मागणी केली होती.(आता Amazon सुद्धा अंतराळ मोहिमेत सामील; Jeff Bezos यांनी सादर केले चंद्रावर झेपावणारे Moon Lander)

या कायद्यासाठी 66 मत पडली होती. तर 25 मत ही विरोधकांनी दर्शवली होती. तर हा कायदा लागू झाल्याने ताइवान येथील अनेक समलैंगिकांनी जल्लोषात त्यांचा आनंद साजरा केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 17, 2019 07:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).