रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin पार्किन्सन आजाराने त्रस्त? The Sun च्या रिपोर्टनंतर व्हायरल होणाऱ्या बातमीवर Kremlin कडून खुलासा
जानेवारी 2021 मध्ये पुतिन राष्ट्रपती पदाचा राजिनामा देणार असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले होते.
रशियाचे राष्ट्रपती (Russia President) व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) हे पार्किन्सन (Parkinson) या आजाराने त्रस्त असल्याने लवकरच पदत्याग करणार असल्याचा दावा द सन (The Sun) च्या एका अहवालात करण्यात आला होता. जानेवारी 2021 मध्ये पुतिन राष्ट्रपती पदाचा राजिनामा देणार असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले होते. द सन चा हा रिपोर्ट अनेक मीडिया हाऊसेसनी प्रकाशझोतात आणला. त्यामुळे इंटरनेटवर पुतिन हे टॉप ट्रेंड बनले. दरम्यान, यावर क्रेमलिन (Kremlin) यांनी मौन सोडले असून त्यांनी पुतिन यांच्या प्रकृतीबाबतचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
पुतीन यांना पार्किन्सन आजाराची संभाव्य लक्षणे असल्याचे दिसून आल्याचे Kremlin watchers हवाला देत द सन यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. मॉस्कोचे राजकीय विश्लेषक वॅलेरी सोलोवे यांनी देखील पुतीन यांना या आजाराची लक्षणे असल्याचे सांगितले होते. तसंच पुतिन यांची गर्लफ्रेंड अलिना काबाएवा आणि त्यांच्या दोन मुली त्यांच्यावर पदाचा राजीनामा देण्यास दबाव आणत आहेत, असेही त्यांनी म्हटले होते. (रशियाचे राष्ट्रपती Vladimir Putin जानेवारी 2021 मध्ये करणार पदत्याग; Parkinson आजाराने त्रस्त- Reports)
पुतीन यांचे पाय सतत हलत असतात आणि खुर्चीच्या आर्मरेस्टला टेकवताच त्यांच्यात वेदना जाणवू लागतात, असेही द सनने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. त्याचबरोबर काही रिपोर्टमध्ये पुतिन यांना पेन धरण्याही त्रास होत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे जानेवारी 2021 मध्ये पुतिन राष्ट्रपतीपदाचा राजिनामा देणार असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह (Dmitry Peskov) यांनी शुक्रवारी (6 नोव्हेंबर) हे सर्व दावे फेटाळून लावले. हा रिपोर्ट खोटा आणि अतिशय मुर्खपणाचा असल्याचे Peskov यांनी सांगितले आहे. राष्ट्रपतींची प्रकृती अतिशय उत्तम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.