Brazil Rain: ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार, महापूरात 56 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरु
पूरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. या पूरांमध्ये आता पर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Brazil Rain: ब्राझीलमध्ये मुसळधार पाऊसामुळे ठिकठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले आहेत. या पूरांमध्ये आता पर्यंत 56 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पूरामध्ये अडकलेल्या आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी घटनास्थळी बचाव कार्य सुरु झाले आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा- कॅनेडात एकसह अनेक वाहनांची धडक होऊन घडला भीषण अपघात)
अल जझीराच्या वृत्तांनुसार, रिओ ग्रांदे दो सुलमध्ये पाण्याची पातळी जास्त असल्याने धरणांवर त्याचा भर वाढतो त्यामुळे महापूराची स्थिती निर्माण झाली. महापूरामध्ये रस्त्यांवर पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांना बाहेर पडण्यास मोठ्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, ठिकठिकाणी बचाव कार्य आणि मदत कार्य सुरु झाले आहे.
ब्राझीलची पूरस्थिती पाहून गव्हर्नर एडुआर्डो लीट यांनी परिसरात आणीबाणीची घोषणा जाहीर केली. " आम्ही आमच्या इतिहासात पाहिलेल्या सर्वात वाईट शोकांतिकेचा सामना करत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मृतांच्या आकड्याच वाढ होऊ शकते, अद्याप बचाव कार्य सुरु आहे. राष्ट्रध्यक्ष लुईझ इनासिओ यांनी सांगितले की, वास्तविक भीषण परिस्थिती पाहता, आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत. ब्राझीला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन देत आहोत. तेथे मानवी आणि भौतिक साधनांची कमतरता भासणार नाही.