Pornography Class: आता कॉलेजमध्ये मिळणार Sex बाबतचे धडे; 'सेक्स क्लास' मध्ये विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र पाहणार पॉर्न फिल्म्स

कॉलेजमधील या 'सेक्स क्लास'बाबत वाद सुरू झाला आहे, मात्र कोणत्याही वादामुळे हा अभ्यासक्रम मागे घेतला जाणार नसून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाईल, असे कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केले आहे

प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

शाळा-महाविद्यालयांमध्ये भलेही सेक्सबद्दल बोलले जात नसेल किंवा भलेही सेक्सबाबत बोलण्याची समाजाची मानसिकता नसेल, परंतु सध्या लैंगिक शिक्षण फार महत्वाचे आहे. अमेरिकेतील एका कॉलेजने विद्यार्थ्यांना 'सेक्स क्लासेस' चालवण्याची ऑफर दिली आहे, ज्यामध्ये क्लासमध्ये अॅडल्ट फिल्म्स दाखवल्या जातील आणि प्राध्यापक विद्यार्थ्यांना सेक्स संदर्भात टिप्स देतील. यूएस मधील सॉल्ट लेक सिटी, उटाह वेस्टमिन्स्टर कॉलेज प्रथमच असा अभ्यासक्रम चालवणार आहे.

आता विद्यार्थी त्यांच्या व्याख्यात्यांसोबत बसून एक्स-रेटेड चित्रपट पाहतील. हा कोर्स 'फिल्म 3000' प्रोग्राम अंतर्गत येतो आणि त्यात तीन क्रेडिट्स असतात. या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सेक्सविषयी माहिती देणे आणि लैंगिकतेबद्दल जागरूकता पसरवणे हे आहे. केएसएल न्यूज रेडिओला दिलेल्या निवेदनात, कॉलेजने म्हटले आहे की वेस्टमिन्स्टर कॉलेज अनेकदा सामाजिक समस्यांचे विश्लेषण करण्याची संधी म्हणून असे वैकल्पिक अभ्यासक्रम ऑफर करते.

वृत्तानुसार, आता कॉलेजमधील या 'सेक्स क्लास'बाबत वाद सुरू झाला आहे, मात्र कोणत्याही वादामुळे हा अभ्यासक्रम मागे घेतला जाणार नसून विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाईल, असे कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी वंश, वर्ग, लिंग आणि लैंगिक संबंधांवर चर्चा करून प्रयोग करणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश असल्याचे महाविद्यालयाने सांगितले. कॉलेजने म्हटले आहे की सेक्स ही एक कला असून त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. (हेही वाचा: XXX Video: उत्तम सेक्स लाईफ साठी पार्टनरसोबत Porn पाहण्याचे होऊ शकतात 'असे' ही फायदे)

सेक्स क्लासेसबाबत, कॉलेज व्यवस्थापनाचा असा विश्वास आहे की हा पोर्नोग्राफी कोर्स विद्यार्थ्यांना वादग्रस्त विषयांच्या गंभीर प्रकरणांमध्ये अडकायचे आहे की नाही हे ठरवण्यास मदत करेल. मात्र, अनेकांनी टीका करत सांगितले आहे की, विद्यार्थी तसेच प्राध्यापकांचे वर्गात एकत्र अश्लील चित्रपट पाहणे हे 'घृणास्पद' कृत्य आहे. परंतु, कॉलेज प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, 2022-2023 या शैक्षणिक वर्षात पॉर्न क्लासेस सुरू केले जातील.