पाकिस्तान: लॉक डाऊन दरम्यान नमाज पठणासाठी एकत्र जमण्यास नाकारल्याने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक; 7 जणांना अटक (Watch Video)
यातील 7 जणांना सध्या अटक करण्यात आली आहे, यामध्ये एका धर्मगुरूंचा सुद्धा समावेश आहे.
जगभराला कोरोनाचा (Coronavirus) फटका बसला असताना पाकिस्तान (Pakistan) मध्ये सुद्धा समान परिस्थिती दिसून येत आहे. आतापर्यंत पाकिस्तानात 2637 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत तर यातील 40 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अशावेळी खबरदारीचा पर्याय म्हणून पाकिस्तान मध्ये लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी नियमाची पायमल्ली केली जात आहे. लॉक डाऊन काळातही अनेकजण घराबाहेर पडत आहेत, आणि विशेष म्हणजे या महाभागांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर सुद्धा हल्ले केले जात आहेत. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी, 3 एप्रिल रोजी घडल्याचे समजत आहे. पाकिस्तान मधील कराची येथे शुक्रवारच्या नमाजासाठी जमण्यास नागरिकांना परवानगी नाकारल्याने त्यांनी चक्क पोलिसांच्या गाडीवरचा दगडफेक केली. यातील 7 जणांना सध्या अटक करण्यात आली आहे, यामध्ये एका धर्मगुरूंचा सुद्धा समावेश आहे. Coronavirus Outbreak: जगात 7 लाख 54 हजार 948 कोरोना प्रकरणे, तर 36 हजार 571 जणांचा कोरोनामुळे बळी; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
मुस्लिम समाजाचा शुक्रवारचा नमाज हा खास मानला जातो, ज्यात अनेकजण एकत्र येऊन नमाज पठण करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरलोकांना एकत्र जमण्यास मनाई केली गेली आहे. पोलिसांनी सुद्धा हीच बाब नागरिकांच्या लक्षात आणून देत शुक्रवारी एकत्रित नमाजाला पाबंदी घातली होती. मात्र यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या गाडी मागे धावत दगडफेक करण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा सध्या ट्विटर वर पाहायला मिळत आहे.
ANI ट्विट
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आता दगडफेक करणाऱ्या स्थानिकांमधील ७ जणांना अटक केली आहे, यामध्ये एका धर्मगुरूंचा सुद्धा समावेश आहे. यापूर्वी दिल्लीतील एका भागात सुद्धा पोलिस व डॉक्टरांवर दगडफेक केल्याची घटना घडली होती, याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.