Pakistan Blast: बलुचिस्तान मध्ये ईद च्या सेलिब्रेशन दरम्यान स्फोट; 34 ठार, जखमींचा आकडा 130 च्या पार
हा स्फोट Madina Masjid जवळ झाला आहे.
पाकिस्तान (Pakistan) मध्ये बलुचिस्तानच्या (Balochistan) मस्तुंग (Mastung) मध्ये भीषण स्फोट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. Eid Miladun Nabi च्या मिरवणूकीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये DSP सह 34 जण मृत्यूमुखी पडले असून जखमीची संख्या देखील 130 पेक्षा जास्त असल्याची माहिती स्थानिक मीडीयाकडून देण्यात आली आहे.
बलुचिस्तान मधील स्फोटाचं कारण समजू शकलेले नाही. हा स्फोट Madina Masjid जवळ झाला आहे. सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) मोहम्मद जावेद लेहरी यांनी मीडीयाला दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट आत्मघाती स्फोट होता आणि बॉम्बरने डीएसपीच्या कारच्या शेजारी स्वत: ला उडवलं आहे. लेहरी म्हणाले की, जखमींना वैद्यकीय मदतीसाठी नजिकच्या रूग्णालयात हलवले जात आहे, तर रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. काही जखमींची स्थिती चिंताजनक आहे.
पहा स्फोटानंतरची स्थिती
पाकिस्तान मध्ये झालेल्या या स्फोटाचा निषेध केला जात आहे. या महिन्याच्या सुरूवातीला देखील झालेल्या एका स्फोटात 11 जण जखमी झाले होते. त्या स्फोटात Jamiat Ulema-i-Islam-Fazl (JUI-F)चे नेते Hafiz Hamdullah देखील जखमी होते.