Isarel Hamas War: इस्त्रायलचा गाझातील शाळेवर बॉम्ब हल्ला; 30 नागरिकांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश (Watch Video)
हा हल्ला शाळेवर झाला. यात जवळपास ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश आहे.
Isarel Hamas War: इस्त्रायल-हमासच्या युद्धात(Israel Hamas War)आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी आपला जीव गमावला. नुकताच इस्त्रायलने मध्य गाझा पट्टी(Gaza Strip)तील नुसरत कॅम्पमध्ये बॉम्ब हल्ला केला आहे. हा हल्ला शाळेवर झाला. यात जवळपास ३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश आहे. इस्त्रायलच्या लढाऊ विमानाने हवाई हल्ला (Airstrike)करत शाळेच्या तीन वर्गांवर हल्ला केला. यात वर्गांमध्ये शिकत असलेल्या अनेक लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक पॅलिस्टिनी नागरिक या शाळेत आश्रय घेत होते. त्याच शाळेवर इस्त्रायलने हल्ला केला आहे.
इस्त्रायली सैन्याने केलेल्या या हल्ल्याचा हमासने निषेद केला आहे. गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने नाराजी व्यक्त करत या हल्ल्याला भयानक नरसंहार म्हटले आहे. मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या या हल्ल्याची जबाबदारी इस्त्रायल आणि अमेरिकेने घेतली पाहिजे, असे गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पहा पोस्ट-
इस्त्रायलने काही दिवसांपूर्वीच रफाह शहरावर हल्ला केला होता. त्यात जवळपास ४५ लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर अनेकांनी या हल्लाचा निषेद करत 'ऑल आइज ऑन रफाह 'असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु केला होता.