Hells Kitchen collapsed In New York: गगनचुंबी इमारतीवरुन क्रेन कोसळले, पाहा व्हिडिओ

ही घटना मॅनहॅटन येथे घडली. ज्यामुळे आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट आकाशात जमीनीपासून 40 मजल्यांहून उंच इमारतीच्या बरोबरीने झेपावताना दिसले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे

Hells Kitchen collapsed

गगनचुंबी इमारतीच्या शीर्षस्थानी असलेली एक क्रेन आग लागल्याने कोसळली ( Hells Kitchen collapsed In New York). ही घटना मॅनहॅटन येथे घडली. ज्यामुळे आगीच्या ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट आकाशात जमीनीपासून 40 मजल्यांहून उंच इमारतीच्या बरोबरीने झेपावताना दिसले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, सुरुवातीला एक मोठा स्फोट झाल्याचा आणि काहीतरी मोठी वस्तू आकाशातून जमीनीवर पडताना होतो तसा गडगडाट झाला. पुढच्या काहीच क्षणात स्थानिक रहिवासी भीतीने जीव मुटीत धरून रस्त्यावरुन धावातानाही पाहायला मिळतात.

अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ही क्रेन टाइम्स स्क्वेअरपासून काही अंतरावर असलेल्या हडसन यार्ड्समधील पश्चिम 41व्या आणि 42व्या रस्त्यांदरम्यानच्या टेन्थ अव्हेन्यूवरील इमारतीवर होती. बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या आधी क्रेनला आग लागली. त्यानंतर क्रेनचा काही भाग कोसळा. क्रेनचा हा भाग क रस्त्याच्या पलीकडे असलेल्या इमारतीवर आदळल्याने इमारतीला मोठी हानी झाली. इमारतीच्या काही भागाला तडे गेल्याने धुळीचे लोटही आकाशात उडत होते. (हेही वाचा, Pakistan LPG Cylinder Blast: पाकिस्तानात मोठी दुर्घटना, एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन सात जणांचा मृत्यू; 10 जखमी)

व्हिडिओ

अग्निशमन विभागाच्या अधिका-यांनी सांगितले की, क्रेनला आग लागून ते अर्धवट कोसळल्यामुळे सहा जण जखमी झाले.त्यापैकी तिघांना रुग्णालयात नेण्यात आले. जखमींमध्ये दोन अग्निशमन दलाचे जवान होते, त्या सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे. हे कर्मचारी क्रेनला लागलेली आग आटोक्यात आण्यासाठी वरुन आणि खालून पाणी फवारत होते. दरम्यान, क्रेनच कोसळ्याने हे जवान जखमी झाले. क्रेन कोसळलेल्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. क्रेनला आग लागली तेव्हा इमारतीत कोणी होते की नाही किंवा इमारतीचेच नुकसान झाले आहे का हे लगेच स्पष्ट झाले नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.