'पालकांनी अनैसर्गिक संभोग केल्यावर Gay मुले जन्माला येतात'; सायप्रसच्या बिशपने तोडले अकलेचे तारे
जगात असे अनेक देश आहेत जिथे समलैंगिकता गुन्हा मानले जाते. जगात या मुद्यावर अनेक चळवळी आणि प्रदर्शने होत राहतात. अशात एका बिशपचे वागद्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय बनत आहे. ‘गरोदर महिलेने अनैसर्गिक शारीरिक संबंध (Abnormal Sexual Act) ठेवल्यावर गे मुल जन्माला येतात’ असे हे वक्त्यव्य आहे.
भारतात नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने एलजीबीटी (LGBT) लोकांना एक ओळख देऊन ऐतिहासिक पाऊल उचलले. गेल्या काही वर्षांपासून भारतात गे (Homosexual) विषयावर भाष्य केले जात आहे. अजूनही जगात असे अनेक देश आहेत जिथे समलैंगिकता गुन्हा मानले जाते. जगात या मुद्यावर अनेक चळवळी आणि प्रदर्शने होत राहतात. अशात एका बिशपचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. ‘गरोदर महिलेने अनैसर्गिक शारीरिक संबंध (Abnormal Sexual Act) ठेवल्यावर गे मुले जन्माला येतात’ असे हे वक्त्यव्य आहे.
चर्च ऑफ सायप्रस चे बिशप निओफिटोस मसूरस ऑफ मॉर्फो (Neophytos Masouras of Morphou) असे या बिशपचे नाव आहे. जून महिन्यात सायप्रसच्या अकाकी येथील प्राथमिक शाळेत बोलताना त्यांनी हे वक्त्यव्य केले होते. सायप्रस मेलच्या म्हणण्यानुसार, या ग्रीक ऑर्थोडॉक्स धार्मिक नेत्याने असा दावा केला की, समलैंगिकता ही एक समस्या आहे, जी सहसा पालकांद्वारे मुलाकडे संक्रमित केली जाते. याबाबत स्पष्टीकरण देताना बिशप म्हणाले, ‘ पालकांनी अनैसर्गिक सेक्स केला असेल किंवा गरोदरपणात अनैसर्गिक सेक्स घडला असेल तर मुलांच्या मनातही तशीच आवड निर्माण होते.’ (हेही वाचा: कार्यक्रमात 5 महिलांना Kiss केल्यानंतर राष्ट्रपतींची धक्कादायक कबुली; मी समलैंगिक होतो, स्त्रियांच्या चुंबनाने झाला बदल (Video))
या बिशपचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या या खुळचट विचारांचा खरपूस समाचार घेतला. काहींनी ‘गे मुले अशा प्रकारे जन्माला येत असतील, तर मग लेस्बियन कशा जन्माला येतात?’ असा प्रश्न विचारला आहे. दरम्यान सायप्रस देशात 2004 मध्ये सेक्शुअल ओरिएन्टेशनमुळे (Sexual orientation) भेदभाव करण्यावर बंदी घातली आहे. 2015 मध्ये गे लोकांना लग्नाचाही अधिकार देण्यात आला आहे. अशा पुढारलेल्या देशात अजूनही बुरसटलेले धर्म प्रवर्तक राहतात आणि इतर लोक त्यांना फॉलो करतात याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)