Foreign Accent Syndrome: अपघातानंतर कोमात गेली मुलगी; उठल्यानंतर बोलू लागली परदेशी उचार असलेली भाषा, जाणून घ्या नक्की काय आहे हा आजार
या अपघातानंतर समर डायझ विविध ठिकाणच्या उच्चारांमध्ये बोलत आहे. काही वेळा समरचा हा इतर देशातील भाषेचा लहेजा काही तास टिकतो तर काहीवेळा तो दोन महिने राहिला आहे. समरने ब्रिटीश, फ्रेंच, रशियन अशा अनेक एक्सेंटमध्ये संभाषण केले आहे
मानवी शरीरात दिवसेंदिवस किती बदल घडू शकतात याचा हिशोब लावणे हे काहीवेळा डॉक्टरांच्याही कल्पनेपलीकडचे असते. आता अमेरिकन (US) तरुणी समर डियाझच्या (Summer Diaz) बाबतीत असेच घडले आहे. समरशी संबंधित एक विचित्र प्रकरण पाहून डॉक्टरांनी कपाळावर हात मारून घेतला आहे. 24 वर्षीय समर डायझचा अपघात झाला होता, त्यानंतर ती कोमात गेली. साधारण दोन आठवडे ती कोमात होती परंतु जेव्हा ती कोमामधून बाहेर आली तेव्हा ती पूर्णपणे नवीन भाषेत बोलत होती.
समर कोमामधून बाहेर आल्यानंतर नर्सेसनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समरला तिच्या देशाबद्दल विचारले. समरने ती अमेरिकेची असल्याचे सांगितले परंतु नर्सेसना यावर विश्वास बसला नाही, कारण समर एका वेगळ्याच लहेजामध्ये इंग्लिश बोलत होती. समरमध्ये घडलेल्या या बदलाची माहिती नर्सेसनी ताबडतोब डॉक्टरांना दिली. या विचित्र बदलांविषयी डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीला समरला बोलायला त्रास होत होता, मात्र हळूहळू जेव्हा ती बोलू लागली तेव्हा तिची भाषा पूर्णपणे बदलली होती.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये समरचा एक वाईट अपघात झाला होता. एका एसयूव्हीने तिला धडक दिली होती. या अपघातात समर खूप जखमी झाली होती व तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ती दोन आठवडे कोमात राहिली. उठल्यानंतर जेव्हा तिने बोलायला सुरुवात केली तेव्हा तिचे उच्चार पूर्णपणे वेगळे होते. आयुष्यभर कॅलिफोर्नियामध्ये राहिलेली समर न्यूझीलंडच्या एक्सेंटमध्ये बोलत होती.
तपासणीनंतर लक्षात आले की, या अपघातामुळे समर अत्यंत दुर्मिळ अशा वैद्यकीय स्थितीला बळी पडली होती. याला फॉरेन एक्सेंट सिंड्रोम म्हणजेच FAS म्हणतात, त्यामुळे समरची भाषा बदललेली दिसत होती. अपघातामुळे किंवा अन्य कारणामुळे मेंदूला काही नुकसान झाले की अनेक वेळा लोकांच्या बोलण्याचे उच्चार बदलतात. समरच्या बाबतीतही हेच घडले होते. वैद्यकीय तज्ञांच्या मते FAS नेमका का आणि कसा घडतो याबाबतचे ठोस कारण समोर आले नाही. (हेही वाचा: Covid-19 Transmission: पूर्णतः लसीकरण झालेल्या लोकांकडूनही घरात पसरू शकतो कोरोना विषाणूचा संसर्ग- Lancet Study)
या अपघातानंतर समर डायझ विविध ठिकाणच्या उच्चारांमध्ये बोलत आहे. काही वेळा समरचा हा इतर देशातील भाषेचा लहेजा काही तास टिकतो तर काहीवेळा तो दोन महिने राहिला आहे. समरने ब्रिटीश, फ्रेंच, रशियन अशा अनेक एक्सेंटमध्ये संभाषण केले आहे. शेवटी हा आजार ऑस्ट्रेलियन किंवा न्यूझीलंडच्या उच्चारावर स्थिरावला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)