Florida Shocker: सूटकेसमध्ये बंद करून केला प्रियकराचा खून; फ्लोरिडामधून हृदय पिळवटून टाकणारी घटना उघड

संधी पाहून साराने सुटकेसचे कुलूप लावले. जॉर्ज याला सुटकेस उघडता न आल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

Photo Credit- X

Florida Shocker: अमेरिकेतील फ्लोरिडा (Florida)शहरात प्रेससी आणि प्रियकरामध्ये सुरू असलेल्या लपवा-छपवीच्या (Hide and Seek) खेळात प्रियकराला जीव गमवावा वागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्रेयसीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जॉर्ज टोरेस (42) असे मृत प्रियकराचे नाव आहे. तर, सारा असे (47) वर्षाच्या मैत्रिणीचे नाव आहे. दोघेही मद्यधूंद अवस्थेत लपवाछपवी खेळत होते. यात प्रियकराचा सुटकेसमध्ये गुदमरून मृत्यू झाला. 23 फेब्रुवारी 2020 ही घटना घडली.

'हाइड अँड सीक' गेम खेळताना प्रियकर सुटकेसमध्ये लपला. संधी पाहून साराने सुटकेसचे कुलूप लावले. जॉर्ज याला सुटकेस उघडता न आल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला. घटनेवेळी जॉर्ज मदतीसाठी ओरडला. मात्र त्याच्या साराने सुटकेस उघडली नाही.घटनेच्या वेळी सारा आणि जॉर्ज दोघांमध्ये बरेच दिवस प्रेमसंबंध होते. दोघेही एका घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. साराने तिच्या बचावात म्हटले की, त्या दिवशी ती खूप मद्यधुंद होती. तिला वाटले की तिचा प्रियकर, स्वतःच सूटकेसमधून बाहेर येईल. असा विचार करून ती नशेत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ती सुटकेसजवळ गेली. तर, तिला तो मृत दिसला.

सारा बूनने सुटकेस उघडली तेव्हा जॉर्ज बेशुद्ध पडलेला होता. तिने त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ऑरेंज काउंटी शेरीफ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा साराने सांगितल्याप्रमाणे प्रकरण घडले नाही. तपासादरम्यान पोलिसांना आढळून आले की हा अपघात नसून सारानेच आपल्या प्रियकराचा खून केला आहे. पोलिसांना त्याच्या मोबाईलमधून अनेक व्हिडिओ सापडले, जे घटनेच्या वेळेचे आहेत. एका व्हिडिओमध्ये सारा बेसबॉलच्या बॅटने सुटकेसवर आपटताना दिसत आहे. ती किंचाळत होती. दुसरीकडे जॉर्ज मदतीची याचना करत होता.

मदतीसाठी ओरडत राहिला, सुटकेस उघडत नव्हते

जॉर्ज टॉरेस तिला सांगत होता की त्याला श्वास घेता येत नाही. यावर सारा म्हणते, "हो, जेव्हा तू माझा गळा दाबतोस तेव्हा तेच होते मला. अरे, जेव्हा तू माझी फसवणूक करतोस तेव्हा मला असेच वाटते." सरकारी वकील विल्यम जे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रात याचा उल्लेख केला आहे. तिच्या गैरकृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर, साराने कोर्टात सांगितले की ती घरगुती हिंसाचाराची शिकार झाली आहे.

दारू पिऊन तिचा प्रियकर तिला रोज मारहाण करायचा. तिचा गळा दाबायचा. त्या रात्री सुद्धा असेच काहीसे घडले. स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिने जॉर्जला सूटकेसमध्ये बंद केले. तिला प्रियकर मरेल हे माहीत नव्हते. तिला फक्त धडा शिकवायचा होता.