म्हणून Facebook कार्यालयातील कर्मचारी सतत स्माईल करतात...
स्माईल पॉलिसीबाबत सांगताना फेसबुकचे सीओओ शेरिल सँडबँग (COO Sheryl Sandberg) यांनी म्हटले आहे की, स्वत: हसतमुख राहिल्याने आपण आपले काम अधिक जोमाने आणि चांगल्या पद्धतीने करु शकतो.
फेसबुकचा (Facebook) कोणताही कर्मचारी पाहिला तर त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक हलकीशी का होईना स्माईल दिसेल. भले त्यांना कितीही दु:ख असो, त्रास असो. पण, फेसबुकच्या कार्यालयात जाताच ते चेहऱ्यावर स्माईल ठेवतात. जे लोक चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवतात ते लवकर यशस्वी होता असा एक सुविचार सांगितला जातो. बहुदा या सुविचाराचे कार्यालयात नेहमी आचरण करण्याचे फेसबुकने ठरवलेले दिसते. कारण, फेसबुकने आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी 'स्माईल पॉलिसी' (Smile Policy) लागू केली आहे.
स्माईल पॉलिसीबाबत सांगताना फेसबुकचे सीओओ शेरिल सँडबँग (COO Sheryl Sandberg) यांनी म्हटले आहे की, स्वत: हसतमुख राहिल्याने आपण आपले काम अधिक जोमाने आणि चांगल्या पद्धतीने करु शकतो. कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने सांगितले की, कंपनीत काम करताना तुम्हाला केवळ कामच करुन चालत नाही. तर, सोबत टीम वर्क टास्कमध्येही सहभागी व्हावे लागते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मन प्रफुल्लीत राहवे यासाठी कंपनीने एक भले मोठे गार्डनही तयार केले आहे. याशिवाय कंपनीचे अधिकारी अधून मधून कर्मचाऱ्यांसोबत गप्पा मारुन त्यांचे मनही जाणून घेतात. (हेही वाचा, फेसबुक वापरताय? सावधान! विकले जात आहेत तुमचे 'प्रायव्हेट मेसेज')
अभ्यासक सांगतात की, हासल्याने आत्मविश्वास वाढतो. तसेच, काम करण्याची इच्छाही दुप्पटीने वाढते. इतर कर्मचाऱ्यांप्रती समूहभावाना वाढिस लागण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठीही बॉससोबतचा संवाद आणि हास्य महत्त्वाची भूमिका निभावते. दरम्यान, केब्रिज अॅनेलिटिका आणि डेटा लिक प्रकरणानंतर फेसबुक सध्या अडचणीच्या काळातून जात आहे. तब्बल आठ लाक लोकांचा डेटा लिक झाल्याचा प्रकार घडल्यानंतर फेसबुक प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर स्वत: मार्क झुकरबर्गलाही माफी मागावी लागली होती.