Mount Etna Eruption in Italy: युरोपमधील सर्वाधिक सक्रिय माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक; खराब दृश्यमानतेमुळे कॅटानियामध्ये विमानसेवा थांबवली (Watch Video)
परिणामी सिसिलीच्या आकाशात राख आणि धुराचे साम्रराज्य पहायला मिळाले.
Mount Etna Eruption in Italy: गेल्या काही दिवसांपूर्वी युरोपमधील सर्वाधिक सक्रिय माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक(Mount Etna Erupts)झाला होता. त्यानंतर आता आज पुन्हा ज्वालामुखी माउंट एटनामध्ये उद्रेक झाल्याचे पहायला मिळात आहेत. त्याबाबतचे व्हिडीओ समोर आले आहेत. परिणामी सिसिलीच्या आकाशात राख आणि धुराचे लोट पहायला मिळाले. पहाटेच्या वेळी हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्यामुळे कॅटानिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर लक्षणीय व्यत्यय (Flights disrupts)निर्माण झाला. ज्वालामुखीच्या राखेमुळे आकाशात दृश्यमानता कमी झाली होती. ज्यामुळे विमानतळाने सर्व फ्लाइट ऑपरेशन थांबवले गेले. परिणामी हवाई वाहतुक विस्कळीत झाली. 3,369 मीटरवर असलेले, माउंट एटना गेल्या दशकभरापासून वाढीव क्रियाकलाप अनुभवत आहे.
स्फोटामुळे दृश्यमानतेत लक्षणीय समस्या निर्माण झाल्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फ्लाइट रद्द झाली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फुटेजमध्ये कॅटानियाच्या शहराच्या मध्यभागी काळ्या राखेच्या जाड थरांनी झाकलेले रस्ते, मंदावलेली वाहतूक दिसत आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 5 जुलै रोजी अशीच घटना घडली होती. माउंट एटनामध्ये झालेल्या उद्रेकामुळे आकाशात राखेचे साम्राज्य निर्माण झाले होते. कॅटानिया विमानतळ उड्डाणे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे हवाई प्रवासात व्यत्यय आला. विमान कंपन्यांनी एक निवेदन जारी करून विमानसेवा थांबवल्याचे सांगितले होते.
विमानसेवा दुपारी 3 वाजता पुन्हा सुरू झाली होती. प्रवाशांना विमानतळाकडे जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्यास सांगितले होते. आकाशात 3 ते 4 किलोमीटर पर्यंत धुराचे लोट पहायला मिळत होते.