अमेरिकन एयर स्ट्राईक आणी कासिम सुलेमानी हत्येचे प्रत्युत्तर देण्यासाठी इराणची युद्धतयारी; पहिल्यांदा मशिदीवर फडकवला लाल झेंडा (Watch Video)
तेहरान इथली मस्जिद-ए-जामकरन या मशिदीवर काल पहिल्यांदा लाल झेंडा फडकवण्यात आला होता
तेहरान: अमेरिका आणि इराण (America- Iran War) मध्ये सुरु असणाऱ्या वादातून जग तिसऱ्या विश्वयुद्धाच्या पायरीवर आहे. अशातच अमेरिकेने केलेल्या एअर स्ट्राईकचा व कमांडर कासीम सुलेमानी (Kasim Sulemani) याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने युद्धाचा इशारा दिला आहे. तेहरान इथली मस्जिद-ए-जामकरन या मशिदीवर काल पहिल्यांदा लाल झेंडा फडकवण्यात आला होता, हा झेंडा युद्धाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. साधारणतः या मशिदीच्या घुमटावर नेहमी धार्मिक संकेत असणारे झेंडे फडकावले जातात पण सध्याच्या परिस्थिती पाहता पहिल्यांदाच हा झेंडा फडकवला गेला आहे, यापूर्वी अनेकदा इराणने युद्धात सहभाग घेतला होता मात्र तेव्हा अशा प्रकारची कोणतीही कृती करण्यात आली नव्हती. अमेरिका-इराण संघर्षात वाढ; इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला; 5 जण जखमी
प्राप्त माहितीनुसार,बगदादमध्ये अमेरिकेने शुक्रवारी सकाळी ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणी लष्करातील कमांडर जनरल कासीम सुलेमानी मारला गेला. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी रात्री उशिरा इराणने बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर प्रतिहल्ला केला आहे.त्यांनतर शनिवारी रात्री उशिरा या मशिदीवर लाल झेंडा फडकावून युद्धाचे संकेत देण्यात आले आहेत.
पहा ट्विट
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला उघडपणे चेतावणी देताना इराणने अमेरिकेवर हल्ला केला तर इराणच्या 52 ठिकाणावर हल्ला करण्यात येईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच अमेरिकेचं सैन्य युद्धासाठी सज्ज असल्याचंही ट्रम्प यांनी म्हंटले आहे. अमेरिकेनं कुवेतमधील आपलं सैन्य बगदादमध्ये पाठवलं आहे. तसेच आखाती देशामध्ये अमेरिकेकडून 3 हजार सैनिक पाठवण्यात आलं आहे.