Indonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...
त्या व्यक्तीने आपली वास्तविक ओळख बुरखा घालून लपवून ठेवली होती. कारण ती व्यक्ती कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह (corona virus ) असूनही उड्डाण घेऊन जाण्याची त्यांची इच्छा होती.
कोरोनाचा (Corona) प्रार्दुभाव पुर्ण जगावर झाला आहे. अनेक लोकांचा यामुळे जीव गेला आहे. यावर प्रतिबंध आणण्यासाठी सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. तर अनेक निर्बंध आणून यावर परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सर्व ठिकाणी लोकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. कोरोना नियम तोडून लोक वागत असून तशी कृती करत आहेत. नुकतीच इंडोनेशियामधील (Indonesia) अशी एक घटना समोर आली आहे. त्यात कोरोना अहवाल सकारात्मक (Cororna Positive) असूनही एका व्यक्तीने विमान (flight) प्रवास केला आहे. इंडोनेशियातील पोलिसांनी (Police) अलीकडेच एका स्त्री वेषात विमानाने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला पकडले आहे. त्या व्यक्तीने आपली वास्तविक ओळख बुरखा घालून लपवून ठेवली होती. कारण ती व्यक्ती कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह (corona virus ) असूनही उड्डाण घेऊन जाण्याची त्यांची इच्छा होती. जेव्हा फ्लाइट अटेंडंटने त्याला लव्हॅरेटरीमध्ये कपडे बदलताना पाहिले. तेव्हा त्याला ही बाब लक्षात आली. त्यानंतर उतरल्यावर त्याला अटक (arrested) करण्यात आले.
ही व्यक्ती 18 जुलैला उत्तर मालुकु प्रांतात जकार्ता ते तेर्नेटकडे जाणाऱ्या सिटीलिंक विमानात बसून प्रवास करत होती. आपली ओळख लपवण्यासाठी चेहरा झाकून टाकला होता. त्याने बनावट आयडी आणि पीसीआर चाचणी निकालही नकारात्मक दर्शविला. जकार्तामध्ये विमानतळ अधिकाऱ्यांना चाप लावण्यास ते यशस्वी ठरला. तरी उड्डाणातील एका परिचर्याने त्याला कपडे बदलताना पकडले. तेर्नाटेचे पोलिस प्रमुख आदित्य लकशीमदा यांच्या सांगण्यानुसार त्याने विमानाचे तिकीट आपल्या पत्नीच्या नावावर विकत घेतले होते. ओळखपत्र, पीसीआर चाचणी निकाल आणि त्याच्या पत्नीचे नाव असलेले लसीकरण कार्ड आणले. सर्व कागदपत्रे पत्नीच्या नावाखाली आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.
फ्लाइट अटेंडंटने तेर्नाटमधील अधिकाऱ्यांना कळविले. त्या व्यक्तीला लँडिंगनंतर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर व्यक्तीची कोविड चाचणीसाठी घेण्यात आली होती. आता त्याचा निकाल सकारात्मक आला आहे. तो सध्या घरात विलगीकरणात आहे. तर याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. अशा काही प्रकरणांमुळे कोरोनाचा अधिक धोका वाढत चालला आहे. यावर सरकारने आणि आणि सामान्य जनतेही खबरदारी बाळगणे गरजेचे बनले आहे. इंडोनेशिया कोरोना व्हायरस प्रकरणात जोरदार झुंज देत आहे. आवश्यक हवाई प्रवासासाठी नकारात्मक कोरोना चाचणी अहवाल अनिवार्य आहे. आशियाई देशात आतापर्यंत 2.9 दशलक्ष कोरोनी संक्रमित झाले आहेत. यामध्ये 77,583 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.