IPL Auction 2025 Live

Queen Elizabeth II यांच्या निधनानंतर King Charles III यांच्याकडे राजगादीची सूत्रं; पहा पुढील वारसदारांचा क्रम!

King George VI या त्यांच्या वडीलांचं वयाच्या 52 व्या वर्षी अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्याकडे ही जबाबदारी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी आली होती.

King Charles III

ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात अधिक काळ राजगादी सांभाळणार्‍या Queen Elizabeth II यांचं 8 सप्टेंबर दिवशी वयाच्या 96व्या वर्षी निधन झाले आहे. महाराणीच्या निधनानंतर तातडीने राजगादीची सुत्रं त्यांचा मोठा मुलगा Charles यांच्याकड देण्यात आली आहे. त्यामुळे आता ते King Charles III म्हणून ओळखले जाणार आहेत. ते राजगादी वर बसणारे सर्वात अधिक वयाची व्यक्ती ठरले आहेत. ब्रिटीश राजगादीचा उत्तराधिकाराची हा Crown Act of 2013 नुसार ठरवला जातो. म्हणजे सर्वात मोठा मुलगा राजा होईल. तत्पूर्वी, राजाचा मुलगा उत्तराधिकारी असलेल्या मुलीवर प्राधान्य घेतो. हे देखील नक्की वाचा: Queen Elizabeth II Death: 'या' कारणामुळे पुढील 10 दिवस राणी एलिझाबेथच्या पार्थिवावर होणार नाही अंत्यसंस्कार; वाचा सविस्तर.

राजगादीचे पुढील उत्तराधिकार्‍यांचा कसा आहे क्रम?

प्रिन्स विल्यम (Prince William)

King Charles III यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी प्रिन्स विल्यम असणार आहेत. प्रिन्स विल्यम हे Duke of Cambridge आहेत. ते Charles आणि त्यांची प्रथम पत्नी डायना यांचे थोरले चिरंजीव आहेत.

प्रिन्स जॉर्ज (Prince George)

प्रिन्स विल्यम यांच्यानंतर राजगादीची सूत्र प्रिन्स जॉर्ज यांच्याकडे येतात. तो त्यांचा मोठा मुलगा आहे. Prince George यांचा जन्म 2013 साली झाला असून ते आता 9 वर्षांचे आहेत. जॉर्ज नंतर, ब्रिटीश राजगादीचे कमी संभाव्य वारस जॉर्जचे धाकटे भावंडे, राजकुमारी शार्लोट, (7 वर्ष) आणि केंब्रिजचे प्रिन्स लुई, (4 वर्ष) हे आहेत.

प्रिन्स हॅरी (Prince Harry)

राजगादी वर यानंतर बसण्याचा मान विल्यम यांचा धाकटा भाऊ प्रिन्स हॅरी यांना मिळू शकतो. ते सध्या 37 वर्षीय आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची मुलं Archie आणि Lilibet राजगादीचे वारस होण्याच्या यादीत येतात.

प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू (Prince Andrew)

महाराणी एलिझाबेझ यांचा मधला मुलगा म्हणजे प्रिन्स अ‍ॅन्ड्र्यू. ते Duke of York आहेत. जानेवारी महिन्यात महाराणी एलिझाबेथ यांनी त्यांच्यावर Virginia Giuffre 17 वर्षीय असताना तिचा छळ झाल्याच्या आरोपाखाली अ‍ॅन्ड्र्यू कडून सार्‍या मानद लष्करी पदव्या आणि चॅरिटीमधील रॉयल रोल्स काढून घेतले होते.

प्रिन्सेस बिअ‍ॅट्रिस (Princess Beatrice)

अ‍ॅन्ड्र्यू यांच्यानंतर त्यांची लेक प्रिन्सेस बिअ‍ॅट्रिस राजगादीची वारसदार आहे. त्यानंतर त्यांच्या नाती Sienna Elizabeth Mapelli Mozzi यांचा जन्म लागतो पण त्यांचा जन्म अगदीच वर्षभरापूर्वी झाला आहे. Beatrice च्या लहान बहिणीनंतर ही जबाबदारी Princess Eugenie आणि नंतर तिचा लेक August Brooksbank कडे जबाबदारी येते.

प्रिन्स एडवर्ड (Prince Edward)

भल्या मोठ्या वारसायादीनंतर ही जबाबदारी महाराणीचा सर्वात लहान मुलगा Prince Edward कडे जबाबदारी येते. ते Earl of Wessex आहेत. त्यांच्यानंतर त्यांची मुलं James आणि Louise Mountbatten-Windsor जबाबदारी सांभाळू शकतील.

महाराणी एलिझाबेझ 70 वर्ष राजगादीवर होत्या. King George VI या त्यांच्या वडीलांचं वयाच्या 52 व्या वर्षी अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्याकडे ही जबाबदारी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी आली होती.