Paris Fire: इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू; 28 जखमी
पॅरिसमध्ये मंगळवारी मध्यरात्री एका इमारतीला आग लागली. या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत.
Paris Fire: पॅरिसमध्ये मंगळवारी (5/2/2019) मध्यरात्री एका रहिवासी इमारतीला आग लागली. या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एरॅंगलर स्ट्रीटवरील आठ मजली इमारतीमध्ये आग लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 30 गाड्या दाखल झाल्या आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, बचावकार्य सुरु असल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement