Abdul Majeed Mangal: ५४ मुलं आणि ६ बायका असलेल्या ट्रक ड्रायव्हरचा ह्रदविकाराच्या झटक्याने मृत्यू, १५० सदस्य असलेल्या कुटुंबास शोकाकुळ
अब्दुल यांना एकुण सहा पत्नी आणि ५४ मुलं असल्याची माहिती पुढे आली आहे. तरी आता त्यापैकी १२ मुलं आणि २ बायकोंचा मृत्यू झाला आहे. म्हणजेचं अब्दुल यांना एकुण ४२ मुलं आणि ४ बायका असा परिवार आहे.
१५० कुटुंबियांचा पालनकर्ता असलेला अब्दुल माजीद यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अब्दुल माजीद हे पाकिस्नातचे रहिवासी असुन ते ट्रक चालक होते. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अब्दुल माजीद जगप्रसिध्द झालेत ते त्यांच्या भल्यामोठ्या परिवारामुळे. पाकिस्तानच्या २०१७ मध्ये झालेल्या जणगणनेनुसार अब्दुल यांना एकुण सहा पत्नी आणि ५४ मुलं असल्याची माहिती पुढे आली आहे. तरी आता त्यापैकी १२ मुलं आणि २ बायकोंचा मृत्यू झाला आहे. म्हणजेचं अब्दुल यांना एकुण ४२ मुलं आणि ४ बायका असा परिवार आहे. तर नातु-नातीन आणि सुना जावई पकडता अब्दुल यांच एकुण दिडशे लोकांचं कुटुंब आहे. अठराव्या वर्षी अब्दुल यांचा पहिला विवाह झाला असुन त्यानंतर त्यांनी पाच विवाह केलेत.
अब्दुल मजीद मेंगल हा अफगाणिस्तानला लागून असलेल्या बलुचिस्तानमधील नोश्की जिल्ह्यातील काली मंगल गावचा रहिवासी होता. हाजीचे गाव क्वेट्टापासून 130 किमी अंतरावर अफगाणिस्तानच्या सीमेजवळ आहे. तरी अब्दुलच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर शोकाकुळ पसरला आहे. तरी त्याच्या १५० कुटुंबियांनी अब्दुल गेल्यानंतर पोरक झाल्याची भावना व्यक्त केली आहे. (हे ही वाचा:- Girl Swallowed Marble: आश्चर्यकारक ! 4 वर्षीय मुलीने गिळले चक्क 61 मार्बल, एक्स-रे पाहून डॉक्टरही झाले अवाक्)
पाकिस्तानातील हा अब्दुल माजीद त्याच्या लग्न आणि मुलांमुळे कायम चर्चेत असायचा. एक ट्रक चालक असुनही त्याने आपलं कुटुंब कायम बांधुन ठेवलं. अब्दुल तब्येतीने तंदुरुस्त होता पण गेले काही महिन्यांपासून अब्दुलच्या आजारपणाच्या कुरबूर सुरु होत्या पण आता अब्दुलचं ह्रदविकराच्या झटक्याने निधन झाल्याने पुन्हा एकदा त्याच्या जंबो परिवार आणि अब्दुलबाबत जगभरात चर्चा रंगली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2022 02:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

