Chinese Woman Dies From Overeating: लाइव्ह इटिंग चॅलेंज दरम्यान 24 वर्षीय चिनी तरुणीचा मृत्यू; 10 किलोपेक्षा जास्त अन्न पोटात साठल्याचा धक्कादायक खुलासा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती वेटर म्हणून काम करत होती. एका मैत्रिणीमुळे तरुणीने लाइव्ह ईटिंग चॅलेंजमध्ये भाग घेतला होता.

Photo Credit- X

Chinese Woman Dies From Overeating: लाइव्ह इटिंग चॅलेंज चिनमध्ये एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. या चॅलेंजमध्ये तरूणीला तिचा जीव गमवावा लागला. पॅन झियाओटिंग असे मृत तरुणीचे नाव आहे. तिचा अति खाण्यामुळे आणि खाल्लेले अन्न न पचल्यामुळे मृत्यू झाल्याचे वैज्यकीय अहवालातून समोर आले आहे. पॅन झियाओटिंग ही मुख्यत्वे वेट्रेस म्हणून काम करत होती. मात्र, पॅनने तिच्या एका मैत्रिणीकडून प्रेरित लाइव्ह ईटिंग चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. या चॅलेंजमध्ये सहभागींना दररोज 10 तासांपेक्षा जास्त वेळ खावे लागायचे. (हेही वाचा: पाकिस्तानात जाण्यासाठी महिलेने बनावट कागदपत्रांचा केला वापर, गुन्हा दाखल)

असे सांगितले जात आहे की सुरुवातीला ती कॅमेऱ्यासमोर एकटीच हे चॅलेंज पूर्ण करत होती. पण जसजसे तिचे चाहते वाढू लागले तसतसे तिने या चॅलेंजचे लाईव्ह स्ट्रीमिंग करायला सुरुवात केली. Creeders.net च्या मते, पॅन झियाओटिंगच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टममध्ये असे दिसून आले की खाल्लेले अन्न न पचल्यामुळे तिचा मृत्यू झाला. यासोबतच तिच्या पोटाचा आकारही विकृत झाला होता. (हेही वाचा: Child Gadget Addiction: मुलांना डिजिटल गॅजेट्सच्या व्यसनापासून दूर कसे ठेवायचे? घ्या जाणून)

Hankyung.com मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, सोशल मीडिया इन्फ्लूएंसर Xiaoting ने इटिंग चॅलेंजमध्ये 10 किलोपेक्षा जास्त अन्न खाल्ले आहे. ज्यात गोड, तिखट, शाकाहारी, मांसाहारी पदार्थांव्यतिरिक्त काही अन्य पदार्थही खाल्ले. विशेष म्हणजे या चॅलेंजमुळे स्वीकारल्यामुळे तिला काही दिवसांपूर्वी रुग्णालयातही दाखल व्हावे लागले होते. त्यावेळी, पॅनला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्रावाचा त्रास झाला होता. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच दुसऱ्याच दिवशी पुन्हा तिने इटिंग चॅलेंजला सुरूवात केली होती. त्यानंतर 14 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.