Russia Starts War With Ukraine: रशियाने केलेल्या गोळीबारात 7 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी देशात मार्शल लॉ जाहीर केला आणि युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाशी लढा आणि पराभूत करण्याची शपथ घेतली. रशियाने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले.युक्रेनने सांगितले की रशियन गोळीबारात किमान सात लोक मारले गेले आणि नऊ जखमी झाले.

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी पहाटे युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली. युक्रेनच्या अनेक भागात स्फोट झाल्याची नोंद झाली रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांनी युक्रेनच्या लुहान्स्क भागातील दोन शहरांवर नियंत्रण असल्याचा दावा केला आहे, असे रॉयटर्सने म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement