WhatsApp Update: 2023 या नव्या वर्षात व्हॅट्सअॅपचे येणार ‘हे’ नवे अपडेट्स, जाणून नव्या फिचर्स बद्दल सविस्तर माहिती

पण आता एवढ्या वरचं थांबेल ते व्हिट्स अप कसलं. २०२३ या नव्या वर्षात व्हॉट्सअप आणखी काही भन्नाट फिचर घेवून येण्याच्या तयारीत आहे.

WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

गेल्या २०२२ या संपूर्ण वर्षभरात व्हॅट्सअपने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन भन्नाट एकापेक्षा एक फिचर्स आणले. पण आता एवढ्या वरचं थांबेल ते व्हिट्स अप कसलं. २०२३ या नव्या वर्षात व्हॉट्सअप आणखी काही भन्नाट फिचर घेवून येण्याच्या तयारीत आहे. यातील कुठला फिचर कधी लॉंच होणार याबाबत अजून तरी व्हॉट्सअप कडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण टेक जगात मात्र व्हॉट्सअप कडून नव्याने भेटीस येणाऱ्या अपडेट्सची रोज चर्चा होताना दिसते. सगळ्यात पहिला म्हणजे २०२३ मध्ये व्हॉट्सअप हा २९ अन्ड्राईड फोन्समध्ये वापरता येणार नाही. हे ४९ जुने मॉडेल्सचे मोबाईल फओन्स असुन हे नेमके कुठले स्मार्ट फोन्स आहेत ह्याची यादी व्हॉट्सअप कडून जारी करण्यात आली आहे. तरी २०२३ या वर्षा पासून या ४९ मोबाईल्समध्ये व्हॉट्सअप चालणार नाही आहे.

 

२०२३ मध्ये व्हॉट्सअप घेवून येणार ‘हे’ नवे फिचर्स:-

1. एडिट मेसेज

WhatsApp वापरकर्ते अनेकदा मेसेज पाठवल्यानंतर तो मेसेज एडिट करु शकत नाहीत म्हणून त्यांना तो मेसेज डिलीट करावा लागतो आणि तोचं मेसेज पुन्हा एकदा नव्याने टाईप करुन पाठवावा लागतो. किंवा तो मेसेज डिलिटही केला गेला नाही तर रिसिव्हरला चुकीचा मेसेज मिळतो. त्याचं साठी एडिट हे फिचर व्हॉट्सअपमध्ये असावं असं प्रत्येक व्हॉट्सअप वापरकर्त्याला वाटत. बीटा परीक्षक सध्या एडिट ऑप्शनवर काम करत असुन लवकरचं ते फिचर व्हॉट्सअप वापरकर्त्यांना वापरता येण्याची शक्यता आहे.

 

2. व्हॉइस स्टेटस अपडेट

WhatsApp वरील स्टेटस अपडेट करत तुम्ही तुमचं करंट स्टेटस तुमच्या कॉन्टॅक्ट्सला दाखवू शकता. पण सध्या तर फोटो, व्हिडीओ किंवा टेक्ट हेच तुम्हा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करु शकता. पण आता तुमच्या आवाजातली एखादी व्हॉईस नोट किंवा एखाद गाणं अथवा एखादी ऑडिओ क्लीप देखील तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला शेअर करता येणार आहे. WABetaInfo नुसार, वापरकर्ते लवकरच तुमच्या स्टेटस अपडेटवर 30 सेकंदांपर्यंत व्हॉइस नोट पोस्ट करू शकतील अशी प्रातमिक माहिती मिळत आहे.

 

3. तारखेनुसार संदेश शोधा

व्हॉट्सअपवर चॅट करणं जेवढं सोपी आहे तेवढचं व्हॉट्सअप वरील जुनी चॅट शोधण कठीणं. पण आता हे काहीसं सोप होण्याची सक्यता आहे. कारण व्हॉट्सअप जुन्या चॅट संबंधी एक अपडेट घेवून येत आहे तरी या अपडेट नुसार तारखेनुसार तुम्ही तुमचे जुने मेसेज सहज शोधु शकणार आहात. लवकरच हा फिचर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहे.