WhatsApp New Update: आता तुमच्या आवाजात ठेवा WhatsApp Status, व्हॉट्सअॅपचा भन्नाट नवा फिचर
पण आता तुमचा स्वतचा आवाज देखील तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर करता येणार आहे.
व्हॉट्सअॅप (WhatsApp) कायमचं आपल्या वापरकर्त्यांसाठी (WhatsApp User) नवनवीन फिचर (feature) घेवून येत असतो. आता व्हॉट्सअॅप पुन्हा एक भन्नाट नवा अपडेट (Update) घेवून आला आहे. हा अपडेट तुमच्या आवाजाशी संबंधीत आहे. म्हणजेचं आता व्हॉट्सअपवर तुमच्या अनेक कॉन्टॅक्ट्सना (WhatsApp Contacts) एकाच वेळी तुम्हाला तुमचा आवाज ऐकवता येणार आहे. तो पण तुमच्या स्टेटसच्या (WhatsApp Status) माध्यमातून. आता हल्ली तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपवर चॅटींग (WhatsApp Chatting), व्हिडीओ कॉल (WhatsApp Video Call), व्हॉईस कॉल (WhatsApp Voice Call), व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status) असे पर्याय उपलब्ध आहेत. पण यांत तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मर्यादा आहेत. म्हणजेचं व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) करताना तुम्ही टेक्सट (Text), फोटो (Photo),व्हिडीओ (Video), व्हॉईस नोट (Voice Note) पाठवू शकता. पण तोच तुम्हाला तुमचं व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर (WhatsApp Status Share) करायचं असलं की मग मात्र तुम्ही फक्त टेक्सट, फोटो,व्हिडीओचं तुमच्या स्टेटसला शेअर करु शकता. पण आता तुमचा स्वतचा आवाज देखील तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर करता येणार आहे.
व्हॉट्सअॅप यूजर्सला (WhatsApp User) प्लॅटफॉर्मवर (Platform) ३० सेकंद पर्यंत व्हाइस स्टेट्स पोस्ट (Voice Status Post) करता येणार आहे. अन्य यूजर्स डाव्या बाजुच्या कोपऱ्यात मायक्रोफोन आयकॉन इंडिकेटर (Microphone Icon Indicator) द्वारा या व्हाइस स्टेट्सला (Voice Status) पाहू शकतील. ज्याप्रमाणे आपण कुठल्याही सामान्य चॅट (General Chat) किंवा ग्रुपचॅटवर (Group Chat) आपम व्हॉईसनोट ऐकतो त्याचप्रमाणे आता तुम्हाला व्हॉट्स अप स्टेटसवर देखील आवाज ऐकता येणार आहे. अतर स्टेटस प्रमाणे हा व्हॉईस स्टेटस देखील तुमच्या कॉन्टॅक्टसला २४ तासांसाठी बघता येणार आहे. (हे ही वाचा:- Elon Musk: अॅपल अँड्रॉइड फोनला टक्कर देण्यास एलॉन मस्क सज्ज, लवकरच लॉंच करणार ब्राण्ड न्यू स्मार्टफोन?)
आयओएस बीटा अपडेट (IOS Beta Update) मध्ये या फीचरला पाहिले आहे. या सोबत या फीचरच्या इंटरफेसचा (Feature Interface) एक स्क्रीनशॉट (Screenshot) सुद्धा शेअर (Share) केला आहे. यानुसार सांगता येवू शकते की व्हॉट्सअॅप (WhatsApp) लवकरच आपला हा नवा फिचर अपडेट (Feature Update) करण्यास सज्ज आहे. तरी व्हॉट्सअॅपच्या (Whats App) करोडो वापरकर्त्यांना या नव्या फिचरची आतुरतेने प्रतिक्षा आहे.