WhatsApp Gold : Update नाही तर Virus, लिंकवर क्लिक करणं पडू शकत महागात

WhatsApp Gold च्या मेसेजपासून दूर रहा, लोकांनी व्यक्त केल्या ट्विटरवर प्रतिक्रिया!

व्हॉट्सअ‍ॅप (Photo Credits: Pixabay)

WhatsApp Gold Update: आजकाल सोशल मीडीयामध्ये फॉरवर्ड मेसेज इतक्या झटपट शेअर केले जातात की त्यामधील तथ्य न तपासताच आपण त्यावर क्लिक करतो. त्यामुळेच अनेकदा आपण अनेकदा आमिषांना बळी पडून मोठ्या आपली काही महत्त्वाची, खाजसी माहिती गमावून बसतो. आजकाल व्हॉट्सअ‍ॅपवरद्देखील अशाचप्रकारे अपडेटबाबत एक मेसेज फिरत आहे. WhatsApp Gold हे नव अपडेट असल्याच यामध्ये सांगण्यात आलं आहे.

WhatsApp Gold अपडेट काय ?

WhatsApp Gold हा केवळ बनाव आहे. या मेसेजमध्ये एक खास लिंक असते. तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड आणि अपडेटचे पर्याय दिसतात. मात्र हा केवळ बनाव आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर मालव्हेअर म्हणजेच व्हायरस तुमची सिस्टिम हॅक करू शकते. तुमचा डाटा यामुळे धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अशाप्रकारच्या कोणत्याच लिंकवर क्लिक करण टाळा.

काही युजर्सनी ट्विटरच्या माध्यामातून याबबात अलर्ट शेअर केले आहेत. त्यामुळे तुम्हीदेखील अशाप्रकारच्या मेसेजपासून दूर राहणच सुरक्षित आहे.