WhatsApp अकाऊंट कम्प्यूटरला लिंक करण्यासाठी Fingerprint आणि Face ID नवं फिचर सादर

दरम्यान, व्हॉट्सअॅप अकाऊंट कॅम्प्युटरला लिंक करण्यासाठी कंपनीकडून नवे सिक्युरिटी फिचर सादर करण्यात आले आहे.

WhatsApp (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅप (WhatsApp) या लोकप्रिय मेसेजिंग अॅपच्या डेटा सुरक्षेबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रश्न उभे केले जात होते. दरम्यान, व्हॉट्सअॅप अकाऊंट कॅम्प्युटरला लिंक करण्यासाठी कंपनीकडून नवे सिक्युरिटी फिचर सादर करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात हे फिचर्स अॅक्टीव्हेट होईल. या नव्या फिचरमुळे युजर्संना अकाऊंट कॅम्प्युटरवर लिंक करण्यापूर्वी फिंगरप्रिंट किंवा चेहऱ्याचा उपयोग करुन व्हेरिफाय केले जाईल. तुमच्या गैरहजेरीत दुसरं कोणी तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट कंम्प्युटरला लिंक करु नये, या उद्देशाने हे फिचर अॅड करण्यात आल्याचे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आलं आहे.

सध्या व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसीवरुन खूप चर्चा सुरु असताना व्हॉट्सअॅपने हे नवे फिचर लॉन्च केले आहे. या फिचरमध्ये फिंगरप्रिंट आणि फेस ऑथेटिकेशन युजरच्या मोबाईलवरुन घेतले जाणार असून युजर्सच्या मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्टोअर असलेल्या कोणतीही बायोमॅट्रीक माहिती व्हॉट्सअॅपकडून वापरली जाणार नाही. यासोबतच डेक्सटॉपवरील व्हॉट्सअॅपचा गैरवापर टाळण्यासाठी अजून एक सिक्युरिटी लेयर अॅड करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

तुमचे व्हॉट्सअॅप तुमच्या डेक्सटॉपवर लिंक करण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेस अनलॉक करावा लागेल. त्यानंतर तुमचा क्युआर कोड स्कॅन करुन तुमच्या डेक्सटॉपला तुम्ही व्हॉट्सअॅप अॅक्सेस करण्याची परवानगी देऊ शकाल. (WhatsApp वर एखाद्याने तुम्हाला ब्लॉक केलय? 'या' पद्धतीने पाठवा मेसेज)

या नव्या फिचरमुळे तुमच्या घरातील इतर व्यक्ती किंवा ऑफिसमधील कलिग्स तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट कोणत्याही डिव्हाईसला लिंक करु शकणार नाहीत. यासोबत पॉप-नोटीसचे फिचर देखील अॅक्टिव्हेट असेल. त्यामुळे तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट डेक्सटॉपवर लॉग इन केल्यास तुमच्या मोबाईलमध्ये पॉप अप येईल, अशी माहिती व्हॉट्सअॅपच्या अधिकृत निवेदनात दली आहे.

व्हॉट्सअॅप तुमच्या मोाबईलमधील बायोमॅट्रीक इंफ्रोमेशन सेव्ह करत नाही. तुमच्या फोनमधल्या ऑपरेटिंग सिस्टमचा कोणताही डेटा हाताळण्याची परवानगी नाही. हे नवे फिचर पुढील आठवड्यात लॉन्च होणार असून यासोबतच मोबाईलमधील व्हॉट्सअॅप वेब पेजेसच्या नवीन डिझाईन देखील लॉन्च होतील.