Telegram Update: टेलिग्रामने लॉन्च केले Auto-Delete Messages सह 'हे' नवे फिचर्स
नवीन बिटा अपडेट v7.5.0 खास फिचर्स घेऊन आलं आहे. यात auto-delete messages, home screen widgets, expiring invite links आणि animated emojis यांचा समावेश आहे.
टेलिग्रामने (Telegram) काही नवे फिचर्स लॉन्च केले आहेत. नवीन बिटा अपडेट v7.5.0 खास फिचर्स घेऊन आलं आहे. यात auto-delete messages, home screen widgets, expiring invite links आणि animated emojis यांचा समावेश आहे. हे सर्व फिचर्स अॅनरॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. चॅट दरम्यान नको असलेले मेसेजेस डिलिट करण्याचा पर्याय अॅपमध्ये पूर्वीपासून होता. आता मात्र ऑटो डिलिट टायमर्स सेट करता येईल. त्यामुळे आधीचे मसेजेच आपोआर डिलिट होतील. ग्रुप आणि चॅनल्ससाठी टायमर बदलण्याचा अधिकार केवळ अॅडमिनला असेल. टायमर सेट झाल्यानंतर पाठवलेल्या मेसेजेस वरती ऑटो डिलिट अॅप्लिकेबल होईल. त्यापूर्वीचे मेसेजेस ऑटो-डिलिट होणार नाहीत.
अॅनरॉईड मोबाईलमध्ये टायमर चालू करण्यासाठी Clear History वर टॅब करा आणि टायमरचा कालावधी निवडा. आयओएसमध्ये टायमर सेट करण्यासाठी Message वर टॅब करुन होल्ड करा आणि त्यानंतर Clear Chat ला टॅब करुन 'Enable Auto-Delete' वर क्लिक करा.
टेलिग्राम व्हिजेट होमस्क्रिनवर अॅड केल्यावर तुम्हाला युजर्सचे चॅट त्वरीत अॅक्सेस करता येतील, या अपडेटमध्ये 'Chat Widget' आणि 'Shortcut Widget' हे दोन Widget ऑप्शन अॅड करण्यात आले आहेत. 'Chat Widget' मध्ये Resend Message चा प्रीव्ह्यू दिसेल. तर 'Shortcut Widget' मध्ये नाव आणि प्रोफाईल दिसेल. Widget अॅड करण्यासाठी तुमच्या होमस्क्रिनवर टॅब करुन होल्ड करा आणि Widgets वर क्लिक करुन टेलिग्रामला सर्च करा.
या अपडेटमध्ये Expiring Invite Links हे नवे फिचर लॉन्च करण्यात आले आहे. या फिचरचा वापर करुन सुमारे 10 लाख लोकांना तुम्ही ग्रुप्स किंवा चॅनलचे इन्व्हाईट पाठवू शकता. अॅडमिन आणि ऑनर्स काही ठराविक कालावधीसाठी इन्व्हिटेशन लिंक पाठवू शकतात. प्रत्येक इन्व्हाईट लिंक QR कोडमध्ये कर्न्व्हर्ट करु शकता. यासाठी ग्रुप किंवा चॅनलचे प्रोफाईल ओपन करा आणि 'Edit' and 'Invite Links' वर क्लिक करा आणि Convert a link to a QR Code वर क्लिक करा. टेलिग्रामच्या या नवीन अपडेटमध्ये नव्या अॅनिमेडेट इमोजीसुद्धा अॅड करण्यात आल्या आहेत.