Solar Eclipse 2022 Indian Superstitions: शिजवलेले अन्न खाणे टाळण्यापासून गर्भवती महिलांना बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यापर्यंत, या गोष्टी आजही ग्रहणा दरम्यान पाळल्या जातात, जाणून घ्या संपूर्ण माहिती

दिवाळी सणामध्ये यंदाचं खंडग्रास सूर्यग्रहण येणार असल्याने अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ग्रहण लागल्यानंतर अनेक गोष्टी टाळल्या जातात. ग्रहणला अशुभ घटना मानली जाते, अनेकांच्या मनात अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या पासून अनेक जण आजही या सगळ्या गोष्टी पाळतात, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

Solar Eclipse 2022 Indian Superstitions: शिजवलेले अन्न खाणे टाळण्यापासून गर्भवती महिलांना बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यापर्यंत, या गोष्टी आजही ग्रहणा दरम्यान पाळल्या जातात, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Solar Eclipse 2022 Indian Superstitions (File Image)

Solar Eclipse 2022 Indian Superstitions: भारतामध्ये दिसणारे 2022 मधले पहिले सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला दिसणार आहे.  हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, यूरोप आणि आफ्रिका खंडामध्ये पाहता येणार आहे. हे ग्रहण त्यांना डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहता येणार आहे. मुंबईत हे ग्रहण संध्याकाळी 4.49 वाजता सुरू होईल. पण ग्रहण संपण्याआधीच संध्याकाळी 6.08 ला सूर्यास्त होणार आहे. त्यामुळे ग्रहणातच सूर्यास्त होताना पहायला मिळणार आहे. दरम्यान, दिवाळी सणामध्ये यंदाचं खंडग्रास सूर्यग्रहण येणार असल्याने अनेकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ग्रहण लागल्यानंतर अनेक गोष्टी टाळल्या जातात. ग्रहणला अशुभ घटना मानली जाते, अनेकांच्या मनात अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या पासून अनेक जण आजही या सगळ्या गोष्टी पाळतात. ग्रहण लागल्यानंतर कोणत्या गोष्टी केल्या जातात आणि कोणत्या गोष्टी टाळतात त्याची यादी आम्ही घेऊन आलो आहोत.  हिंदू पौराणिक कथेनुसार, एक राक्षस, राहू, ज्याला केतू म्हणून ओळखले जाणारे स्वतंत्र शरीर देखील आहे, प्राचीन लोककथांच्या आधारे त्याने  सूर्य आणि चंद्राविरूद्ध सूड घेण्याची शपथ घेतली. यामुळे, राहू हा राक्षस  सूर्य आणि चंद्राला पकडतो आणि त्यांना गिळतो. ही घटना फार काळ टिकत नाही कारण राहूला हात नाही. या पौराणिक कथेनुसार लोक सूर्यग्रहणात काही कठोर नियमांचे पालन करतात.

चला तर मग, पाहूया 

  • ग्रहण दरम्यान अन्नपदार्थ खाणे आणि शिजवणेटाळले जाते. म्हणून ग्रहणाच्या अधि आणि नंतर भोजन केले जाते.
  • सूर्यग्रहण काळात मंदिराचे दरवाजे आणि घरातीलदेवघर बंद केले जातात. ग्रहणानंतर देवतांच्या मूर्ती पूजा करण्यापूर्वी पवित्र गंगाजलाने शुद्ध केल्या जातात आणि मग पूजा केली जाते. 
  • सूर्यग्रहणाच्या वेळी लोक मंत्र, भजन आणि भक्तीगीते म्हणतात, जेणेकरून वाईट प्रभावापासून स्वतःला सुरक्षित ठेऊ शकतील. 
  • काही लोक तुळशीची पाने शिजवलेल्या अन्नपदार्थांमध्ये आणि पाण्यात टाकतात. जेणे करून अन्न दुषित होणार नाही.
  • गर्भवती महिलांना ग्रहण काळात घराबाहेर न पडण्याची सूचना दिली जाते कारण यामुळे गर्भाला इजा होऊ शकते.
  • लोक तेल मसाज, दात घासणे, केस कंगवा किंवा लैंगिक क्रियाकलापांमध्ये गुंतत नाहीत. तथापि, या अंधश्रद्धा शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांनी खोडून काढल्या आहेत कारण सूर्यग्रहण मानवी वर्तन, आरोग्य आणि पर्यावरणावर परिणाम करू शकते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

 

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2022 06:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).