Chandrayaan-3: पुढच्या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत चांद्रयान -3 अवकाशात झेपावण्याची शक्यता- डॉ जितेंद्र सिंह
Chandrayaan-2 (Photo Credits-ANI)

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान , भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ; पंतप्रधान कार्यालय , कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, यापुढे सामान्य कामकाज गृहीत धरून वर्ष 2022 च्या तिसर्‍या तिमाहीत चांद्रयान -3 अवकाशात सोडले जाण्याची शक्यता आहे . आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ते म्हणाले की चांद्रयान -3 चे काम प्रगतीपथावर आहे.

चांद्रयान -3 च्या तयारीमध्ये साधनांच्या मांडणीला अंतिम रूप देणे, उपप्रणालीची उपलब्धता, एकात्मीकरण , अवकाशयान पातळीची तपशीलवार चाचणी आणि पृथ्वीवर प्रणालीच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी विशेष चाचण्यांचा समावेश आहे. कोविड --19 महामारीमुळे या कामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र लॉकडाउन काळातही घरून करणे शक्य असलेली सर्व कामे करण्यात आली. अनलॉक कालावधी सुरू झाल्यानंतर चांद्रयान -3 चे काम पुन्हा वेगाने सुरू झाले आणि ते अंतिम टप्प्यात आले आहे.