खुशखबर! आता उबरची हवाई कार; ट्रॅफिकच्या त्रासापासून नागरिकांची लवकरच सुटका

एकदा उड्डाण घेतल्यावर कमीत कमी 75 किलोमिटरचा प्रवास करता येईल असा पद्धतीने या कारचे डिझाईन बनविण्यात आले आहे. दरम्यान, बोईंग कंपनीप्रमाणेच एअरबस आणि सिलिकॉन व्हॅली येथील इतरही काही कंपन्या हवाई कार बनविण्यावर संशोधन करत आहेत

Successful Test Flight Of Air Taxi | (Photo courtesy: Archived, Edited and Symbolic Images)

Successful Test Flight Of Air Taxi: एरोस्पेस आणि विमान निर्माता जगप्रसिद्ध कंपनी बोइंग उबर लवकरच हवाई कार (Uber Air Taxi) लॉन्च करण्याची शक्यता आहे. बोइंगने प्रसारमाध्यमांना सांगितले की, कंपनीने वॉशिंग्टन डीसी जवळ एका छोट्या विमानतळावर आपल्या ऑटोनोमस टॅक्सी (हवाई कार) ची पहिले चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. या कारमध्ये एकही प्रवासी नव्हता. या कारने अवघ्या एका मिनिटात उड्डाण घेतले. ही हवाई कार बॅटरीवर चालणारी असून, तिने चाचणी दरम्यान, जमीनीवरुन हवेत उड्डाण घेतले. काही वेळ हवेत घिरट्या मारल्या आणि पुन्हा यशस्वीरित्या खाली आली. ही चाचणी यशस्वी झाली असली तरी, अद्याप या कारने अवकाशात उड्डाण घेतले नाही. ते परिक्षण अद्याप व्हायचे आहे. दरम्यान, चाचणीवेळी हवाई कार जमीनीपासून किती अंतरावर वर गेली याबाबत मात्र कंपनीने माहिती दिली नाही.

प्राप्त माहिती अशी की, हवाई कारचा प्रोटोटाइप 30 फूट लाब आणि 26 फूट रुंद आहे. एकदा उड्डाण घेतल्यावर कमीत कमी 75 किलोमिटरचा प्रवास करता येईल असा पद्धतीने या कारचे डिझाईन बनविण्यात आले आहे. दरम्यान, बोईंग कंपनीप्रमाणेच एअरबस आणि सिलिकॉन व्हॅली येथील इतरही काही कंपन्या हवाई कार बनविण्यावर संशोधन करत आहेत. तंत्रज्ञानाच्या भाषेत या कारला इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ आणि लॅंडींग (eVTOL) म्हटले जात आहे. ही कार बाजारात आल्यानंतर मोठी क्रांती होणार असल्याचे बोलले जात आहे. कास करुन शहरांमधील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होईल. नेहमीच्या रहदारीमुळे (ट्रॅफीक) कंटाळलेल्या नागरिकांची सुटका होण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, शाब्बास रे पठ्‌ठ्या, पुणेकर काहीही करु शकतात! 12 वर्षीय हाजीक काझी याने लावला समुद्रातील प्लास्टिक काढण्याचा शोध)

प्राप्त माहिती अशी की, ऑडी इटालडिजाइनसोबत हवाई कारच्या संकल्पनेवर काम सुरु आहे. एरोमोबिलने असा प्रकारच्या वाहनाचे प्रोटोटाइप तयार केले आहे. विशेष म्हणजे या कारचे पंख काढल्यास ही कार रस्त्यांवरही धाऊ शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif