Mitron App नंतर आता Remove China App ही Google Play Store वर करतंय हकालपट्टीचा सामना
मागिल दोन आठवड्यांपासून या अॅपला पसंती दर्शवलेल्या लांकांना डेव्हलपरने धन्यवादही दिले आहेत.
अनेक भारतीय युजर्सच्या मोबाईलमधून Mitron App गायब झाल्यानंतर आता चायनीज अॅप सुद्धा Google Play Store वर असाच सामना करत आहे. Mitron App हे चायनीच अॅप असलेल्या TikTok ला टक्कर देईल अशी चर्चा होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेले मित्रों हे अॅप अडचणीत आले आहे. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत पन्नास पेक्षाही अधिक युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केले होते. दरम्यान, चायनीज अॅप गुगलवरुन हटवणे आश्चर्यकारक मानले जात आहे.
दरम्यान, अॅपचा विकासक (डेव्हलपर) - वन टच अॅप लॅबने ट्विटरवर जाहीर केले की, त्यांचे अॅप प्ले स्टोअरवरून निलंबित करण्यात आले आहे. मागिल दोन आठवड्यांपासून या अॅपला पसंती दर्शवलेल्या लांकांना डेव्हलपरने धन्यवादही दिले आहेत. (हेही वाचा, TikTok ला टक्कर देणारे Mitron App प्ले स्टोअर वरून हटवले; गुगल ने मित्रों अॅपवर लावला नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप)
ट्विट
दरम्यान Remove China Apps Application अशा पद्धतीेने डिझाईन करण्यात आले आहे की, ते युजर्सच्या फोनवरील सर्व चीनी अॅप हटवतात. हे अॅप युजर्सचे डिव्हाईस स्कॅन करतात आणि चीनी अॅपसह इतर अॅपची यादी दर्शवतात. तसेच, चीनी अॅप आणि इतर अॅप यांतील नेमके कोणते अॅप हटवायचे आहे याबाबतही मार्गदर्शन करते. हे अॅप लक्षवधी लोकांनी डाऊनलोड केले आहे.