Poco X4 Pro 5G स्मार्टफोन आज भारतात लाँच होणार; असं पाहू शकता Live Streaming, संभाव्य किंमत जाणून घ्या
फोटोग्राफीसाठी यामध्ये यूजर्सला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनचा मुख्य सेन्सर 64MP असेल, तर 8MP अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP मॅक्रो शूटर दिला जाईल
Poco ने शक्तिशाली फीचर स्मार्टफोन Poco X4 Pro 5G भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन अधिकृतपणे आज म्हणजेच 28 मार्च रोजी लॉन्च करण्यात आला. या स्मार्टफोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो Advanced Mocap तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. भारतातील Poco X4 Pro 5G संभाव्य किंमत आणि वैशिष्ट्यांबद्दल तपशीलवार जाणून घेऊयात...
Poco X4 Pro 5G स्मार्टफोन आज दुपारी 12 वाजता भारतात लॉन्च होईल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने आधीच स्पष्ट केले आहे. हे फ्लिपकार्टवर अनेक विशेष वैशिष्ट्यांसह सूचीबद्ध केले गेले आहे. (हेही वाचा - Flipkart Electronics Sale 2022: फ्लिपकार्टवर सेल सुरू! स्वस्तात खरेदी करू शकता Smartphones, TVआणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू; जाणून घ्या डिस्काउंट ऑफर)
Poco X4 Pro 5G: चे Live Streaming कसे पाहावे?
Poco X4 Pro 5G स्मार्टफोनचा लॉन्च इव्हेंट दुपारी 12 वाजता सुरू होईल आणि तुम्ही घरबसल्या या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकता. Poco X4 Pro 5G चा लॉन्च इव्हेंट कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनलवर थेट पाहता येईल. लाईव्ह स्ट्रीम पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
Poco X4 Pro 5G: किंमत
Poco X4 Pro 5G बद्दल समोर आलेल्या लीक्सनुसार, हा स्मार्टफोन 25,000 रुपयांच्या आसपास बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो.
Poco X4 Pro 5G: संभाव्य स्पेसिफिकेशन्स -
Poco X4 Pro 5G मध्ये, वापरकर्त्यांना 6.67-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 सह लेपित असेल. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर सादर केला जाईल आणि त्यात ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU वापरता येईल. यात 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिले जाऊ शकते.
फोटोग्राफीसाठी यामध्ये यूजर्सला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनचा मुख्य सेन्सर 64MP असेल, तर 8MP अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP मॅक्रो शूटर दिला जाईल. याशिवाय, पंच होल कटआउटसह फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी, हा स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीसह सुसज्ज असेल, जो 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)