MPL Layoffs: सरकारने ऑनलाईन गेमिंगवर 28% जीएसटी लावताच मोबाइल प्रीमियर लीगकडून टाळेबंदीचा निर्णय
या कंपनी एका वर्षात करत असलेली ही दुसरी टाळेबंदी आहे. या आधी कंपनीने 100 हून अधिक लोकांना कामावरुन कमी केले आहे. एमपीएलचे अंतिम भांडवली मूल्य $2.3 बिलियन इतके होते.
28% GST on Online Gaming: भारतातील एक प्रमुख गेमिंग प्लॅटफॉर्म मोबाइल प्रीमियर लीग आपल्या 350 कर्मचार्यांना कामावरुन काढून टाकणार (MPL Layoffs) आहे. एमपीएलचा कर्मचारी कपातीचा हा दुसरा टप्पा असेल. कौशल्याचा खेळ आणि संधीचा खेळ यात फरक न करता GST परिषदेच्या संपूर्ण ठेव रकमेवर भरीव 28% कर आकारण्याच्या प्रस्तावानंतर MPL द्वारा हे पाऊल उचलण्यात आले आहे. सध्या, गेमिंग प्लॅटफॉर्म त्यांच्या प्लॅटफॉर्म फीवर 18% GST च्या अधीन आहेत.
नवीन नियमांमुळे आमच्या कराचा बोजा 350-400 टक्क्यांनी वाढेल. व्यवसाय म्हणून, एखादी व्यक्ती, संस्था 50 टक्के किंवा अगदी 100 टक्के वाढीची तयारी करू शकते. परंतु अचानक वाढलेल्या आर्थिक तीव्रतेशी जुळवून घेण्यासाठी आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे एमपीएलचे सह-संस्थापक साई श्रीनिवास आणि शुभ मल्होत्रा यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
एमपीएल ही बेंगळुरू- येथील स्टार्टअप आहे. या कंपनी एका वर्षात करत असलेली ही दुसरी टाळेबंदी आहे. या आधी कंपनीने 100 हून अधिक लोकांना कामावरुन कमी केले आहे. एमपीएलचे अंतिम भांडवली मूल्य $2.3 बिलियन इतके होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये $150 दशलक्ष जमा केल्यानंतर, ज्याने युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश देखील केला होता.