Pegasystems Layoffs: पेगासिस्टम्स कंपनी घाबरली संभाव्य आर्थिक मंदीला, 4% कर्मचार्यांवर कपातीची टांगती तलवार

कंपनीने 2022 च्या चौथ्या तिमाहीत 18.9 दशलक्ष डॉलर्सचे उत्पादन काढण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2023 मध्ये येणाऱ्या संभाव्य आर्थिक मंदीच्या (Economic Recession 2023) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येत असल्याची चर्चा आहे.

Pegasystems Logo (Photo Credit: Facebook)

सॉफ्टवेअर कंपनी पेगासिस्टम्स (Software Company Pegasystems) आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या 4 टक्क्यांनी कमी (Pegasystems Layoffs) करण्याचा विचार करत आहे. कंपनीने 2022 च्या चौथ्या तिमाहीत 18.9 दशलक्ष डॉलर्सचे उत्पादन काढण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2023 मध्ये येणाऱ्या संभाव्य आर्थिक मंदीच्या (Economic Recession 2023) पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनकडे दाखल केलेल्या फाइलिंगमध्ये ही बाब पुढे आली आहे. कंपनीच्या अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ही कपात म्हणजे कंपनीच्या गो-टू-मार्केट ऑपरेटिंग मॉडेलमध्ये सुधारणा करण्याच्या उद्दिष्टाचा भाग आहे. कंपनीचे हे पाऊल कंपनीला अधिक कार्यक्षमता वाढवणारे आणि सक्षम ठरेल. कंपनीच्या ग्राहकांवरील लक्ष अधिक केंद्रीत करेल प्रामुख्याने जिथे त्याच्या गुंतवणुकीत वाढ झाली आहे.

पेगासिस्टम्सने कपातमुळे प्रभावित होणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या जाहीर केली नाही. परंतू, मीडिया रिपोर्ट्सनुसार पेगासिस्टम्समध्ये 6,133 कर्मचारी काम करत आहेत. पेगासिस्टम्समच्या शेअर शेअर्सची किंमत 69 टक्क्यांनी खाली आल्याने पेगासिस्टम्सच्या भागधारकांना मोठा तोटा सहन करावा लागला असल्याचे यापूर्वीच्या अहवालात म्हटले आहे. तीन वर्षांतील परतावाही गुंतवणूकदारांसाठी तोट्याचा ठरला आहे. त्यामुळे 2023 मध्ये येणाऱ्या संभाव्य मंदीच्या भीतीने सॉफ्टवेअर कंपनी पेगासिस्टम्स तिच्या 6,000 हून अधिक कर्मचार्‍यांपैकी 4 टक्के कर्मचारी कमी करत आहे. (हेही वाचा, Amazon Layoffs: अॅमेझॉनमधील राजीनाम्यांची Labour Ministry कडून होणार चौकशी; कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्याची शक्यता- Report)

दरम्यान, सॉफ्टवेअर कंपनी Amazon आणि Salesforce यांनीही नवीन वर्षात मोठ्या नोकऱ्या कपातीची घोषणा केली आहे. Amazon ने सुमारे 18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली असताना, Salesforce ने जवळपास 7,000 कर्मचाऱ्यांना जाण्यास सांगितले आहे. लेऑफ ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, नवीन वर्षाच्या अवघ्या 5 दिवसांत टेक कंपन्यांनी 28,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. 2022 मध्ये 1,168 कंपन्यांनी 2,43,468 कामगारांना कामावरून काढून टाकले.