भारतात लाँच झालेल्या Oppo A12 स्मार्टफोनची 'ही' जबरदस्त वैशिष्ट्ये पाहून तुम्हीही व्हाल हैराण, 10 जूनपासून होणार विक्रीसाठी उपलब्ध
21 जूनपर्यंत हा स्मार्टफोन खरेदी करणा-या ग्राहकांना 6 महिन्यांची वॉरंटी मिळणार आहे.
स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने आपला नवा स्मार्टफोन Oppo A12 लाँच केला आहे. जबरदस्त स्टोरेज आणि कॅमेरा फिचर्स असलेल्या स्मार्टफोनला पाण्याच्या थेंबाचा डिस्प्ले नॉच देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे 3D डायमंड ब्लेज डिझाईन आहे ज्यामुळे या स्मार्टफोनला एका वेगळचा लूक येतो. या स्मार्टफोनच्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजची किंमत 9990 रुपये आहे. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या वेरियंटची किंमत 11,490 रुपये आहे. हा स्मार्टफोन निळा आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. 10 जूनपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Oppo A12 स्माटफोनच्या लाँच ऑफर्स बद्दल बोलायचे झाले तर, बँक ऑफ बडोदा च्या क्रेडिट कार्ड वर EMI सह 5% कॅशबँक मिळेल. 21 जूनपर्यंत हा स्मार्टफोन खरेदी करणा-या ग्राहकांना 6 महिन्यांची वॉरंटी मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये Storage ची समस्या उद्भवतेय? 'या' पद्धतीने वाढवा स्पेस
Oppo A12 या स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी (Display) बोलायचे झाले तर, हा Android-Pi आधारित कलर ओएस 6.1.2 वर काम करतो. या फोनमध्ये 6.22 इंचाची एच डी डिस्प्ले, 89% स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 1500: 1 कॉनट्रास्ट रेशियो, 450 निट्स ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येतो. याशिवाय या फोनमध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक हेलिओ P35 प्रोसेसरसह 4GB रॅम दिला गेला आहे.
याच्या स्टोरेजविषयी (Storage) बोलायचे झाले तर, यात 64GB शिवाय 256GB पर्यंत मायक्रोएसडी सपोर्ट मिळतो. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल कॅमेरा (Camera) दिला गेला आहे. ज्यात 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा कॅमेरा दिला गेला आहे. सेल्फीसाठी 5MP चा कॅमेरा दिला गेला आहे ज्यात F/2.4 अॅर्पचर आहे.
या स्मार्टफोनमध्ये 4230mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी Oppo A12 मध्ये 4G, ब्यूटूथ 5.0, GPS देण्यात आले आहे.