वनप्लस नॉर्ड स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डरला आज दुपारी 1.30 पासून Amazon.in वर सुरुवात; जाणून घ्या सरप्राईज गिफ्टबॉक्स सह काय आहेत ऑफर्स

वनप्लस नॉर्ड हा स्मार्टफोन 21 जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहे. या फोनची सध्या सर्वत्र चर्चा असून हा अफोर्डेबल हँडसेटच्या प्री-ऑर्डरला आजपासून सुरुवात होणरा आहे. आज दुपारी 1.30 वाजल्यापासून अॅमेझॉन इंडियावर तुम्ही याची प्री-ऑर्डर करु शकता.

वनप्लस नॉर्ड स्मार्टफोनच्या प्री-ऑर्डरला आज दुपारी 1.30 पासून Amazon.in वर  सुरुवात; जाणून घ्या सरप्राईज गिफ्टबॉक्स सह काय आहेत ऑफर्स
OnePlus Nord Render Images (Photo Credits: EvLeaks)

वनप्लस नॉर्ड (OnePlus Nord) हा स्मार्टफोन 21 जुलै रोजी भारतात लॉन्च होणार आहे. या फोनची सध्या सर्वत्र चर्चा असून हा अफोर्डेबल हँडसेटच्या प्री-ऑर्डरला आजपासून सुरुवात होणरा आहे. आज दुपारी 1.30 वाजल्यापासून अॅमेझॉन इंडियावर तुम्ही याची प्री-ऑर्डर करु शकता. हा मोबाईल अॅमेझॉनवरुन प्री-ऑर्डर करु शकता. या वेबसाईटवर प्री-ऑर्डर करणाऱ्यांना 5 हजार रुपयांचे बेनिफीट्स मिळणार आहेत. वनप्लस नॉर्डची खरेदी 31 ऑगस्ट 2020 पर्यंत करणाऱ्यांना वनप्लस कंपनी मार्फत एक सरप्राईज गिफ्टबॉक्स मिळणार आहे. या गिफ्टबॉक्समध्ये वनप्लस बुलेट्स वायरलेस व्ही वन हेडफोन आणि एक फोन कव्हर मोफत देण्यात येणार आहे. अॅमेझॉनच्या पेजवर युजर्ससाठी 'Notify Me' असे बटण प्री-बुकींगच्या रिमांईडरसाठी देण्यात आले आहे.

या मोबाईलमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॅम स्पॅनड्रगन 765G प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस fluid AMOLED डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. या मोबाईलमध्ये कॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 48 MP चा मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाईल्ड एन्गल लेन्स, 5MP चा मॉक्रो लेन्स आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स:

प्रोसेसर Qualcomm Snapdragon 765G
रॅम 8GB / 12GB
इंटरनल स्टोरेज (मेमरी) 128GB / 256GB
बॅटरी 4,115mAh
बॅक कॅमेरा 48MP, 8MP, 5MP, 2MP
सेल्फी कॅमेरा 32MP, 8MP
फास्ट चार्जिंग सपोर्ट 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ड्युअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये 32MP चा मेन कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईल्ड एन्गल लेन्स देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज आणि 12GB रॅम + 256GB इंटरनल स्टोरेज हे दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. हा मोबाईल 'ब्लू मार्बल,' 'ऑनिक्स ब्लॅक' आणि 'ग्रे अॅश' या तीन रंगात उपलब्ध होणार आहे. यात 4,115mAh ची बॅटरी देण्यात आली असून 30W ची फास्ट चार्गिंग सुविधा आहे.

OnePlus Nord Front Camera (Photo Credits: Slash Leaks)
OnePlus Nord India Pre-bookings (Photo Credits: Amazon India)

हा मोबाईल अॅनरॉईड 10 बेस्ड OxygenOS वर ऑपरेट होतो. वनप्लस नॉर्डच्या 8 GB आणि 128GB मेमरी असलेल्या वेरिएंटची किंमत 26,990 रुपये इतकी आहे. तर 12GB रॅम आणि 256GB मेमरी असलेल्या वेरिएंटची किंमत 29,999 रुपये इतकी आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2020 01:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).