WhatsApp New Feature: खुशखबर! आता व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये लवकरच 1000 पेक्षा जास्त सदस्यांना जोडता येणार; कंपनीकडून चाचणी सुरू

मात्र, नव्या बदलांनंतर हा फरक संपणार आहे. हे उघड झाले आहे की, लवकरच 1,024 सदस्य व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकतील. या नवीन फिचरची चाचणी घेतली जात आहे.

WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

WhatsApp New Feature: मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर सतत नवीन फीचर्सचा लाभ यूजर्सना मिळत असतो. सध्या व्हॉट्सअॅपच्या ग्रुप मेसेजिंग सिस्टममध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. यापूर्वी एका ग्रुपमध्ये केवळ 256 सदस्यांचा समावेश करता येत होता. मात्र, आता कमाल सदस्यसंख्या 512 करण्यात आली. नवीन अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की ग्रुप सदस्यांची संख्या पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते आणि आता ती पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे.

इतर मेसेजिंग अॅप्सच्या तुलनेत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कमी सदस्यांचा समावेश केला जाऊ शकतो. मात्र, नव्या बदलांनंतर हा फरक संपणार आहे. हे उघड झाले आहे की, लवकरच 1,024 सदस्य व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकतील. या नवीन फिचरची चाचणी घेतली जात आहे. अशाप्रकारे, यूजर्संना एकाच वेळी हजाराहून अधिक लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. परिणामी वापरकर्त्यांचा ग्रुप मेसेजिंगचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. (हेही वाचा - WhatsApp Latest Update: व्हाट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरमुळे 'No Screenshot';  सविस्तर घ्या जाणून)

व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जनमध्ये चाचणी सुरू -

WABetaInfo, WhatsApp अपडेट्सची माहिती देणाऱ्या प्लॅटफॉर्म नुसार, मेटा-मालकीचे अॅप विद्यमान 512 सहभागींच्या ग्रूप मर्यादांमधील बदलांची चाचणी घेत आहे. आता अॅडमिनला एका ग्रुपमध्ये 1,024 सदस्य जोडण्याचा पर्याय दिला जात आहे. या फीचरची बीटा यूजर्ससोबत चाचणी केली जात असून निवडक बीटा यूजर्संना या फीचरचा लाभ मिळत आहे.

दरम्यान, अधिक चांगली गोपनीयता देत, व्हॉट्सअॅपने आपले व्ह्यू वन्स वैशिष्ट्य बदलले आहे. आतापर्यंत व्ह्यू वन्स फीचरसह पाठवलेले फोटो किंवा व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेतले जाऊ शकत होते. आता वापरकर्ते व्ह्यू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाहीत आणि त्यांना हा पर्याय मिळणे बंद झाले आहे. म्हणजेच, View Ones सह पाठवलेल्या मीडिया फाइल्सवर यूजर्सना चांगली गोपनीयता मिळेल.

तथापी, व्हॉट्सअॅप बिझनेस वापरकर्त्यांसाठी प्रीमियम सेवेची चाचणी देखील केली जात आहे. कंपनी निवडक वापरकर्त्यांना अनेक प्रगत वैशिष्ट्यांचा लाभ देत आहे. लहान आणि मोठ्या व्यवसायांना प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवेचा लाभ मिळेल, जेणेकरून ते अधिकाधिक ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकतील. मात्र, याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.



संबंधित बातम्या