Metro Ticket On What's App: आता मेट्रो तिकीट थेट व्हॉट्स अॅपवरुन बुक करता येणार, जाणून घ्या तिकीट बुकींग प्रक्रिया
व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून आता पुणेकरांना थेट मेट्रो प्रवासाची तिकीट बुक करता येणार आहे.
व्हॉट्स अॅपचा (Whats App) वापर सध्या तुम्ही चॅटींग (Chating) करण्यासाठी, तुमच्या प्रियजनांना मेसेज (Message) पाठवण्यासाठी किंवा बहुदा ऑनलाईन पेमेंटसाठी (Online Payment) ही करत असाल पण आता व्हॉट्स अपच्या माध्यमातून आता तुम्हाला थेट तुमच्या मेट्रो प्रवासाची तिकीट बुक (Metro Travel Ticket Booking) करता येणार आहे. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून तुम्हाला मेसेजस (Message), फोटो (Photo),व्हॉईस मेसेज (Voice Messages), ऑडिओ क्लीप (Audio Clip), व्हिडीओ कॉल (Video Call), ऑडिओ कॉल (Audio Call) या सगळ्या सोयी उपलब्ध आहेच पण हो मेट्रोचं तिकीट न काढत थेट व्हॉट्स अपच्या माध्यमातून जर तुम्हाला हे तिकीट काढता येणार असेल तर तुमचा विश्वास बसणार नाही ना पण हो आता हे शक्य आहे. तरी सध्या तरी ही सुविधा फक्त पुणे मेट्रोसाठी उपलब्ध आहे. पुणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
व्हॉट्स अपद्वारे मेट्रो तिकीट बुक करण्याची प्रक्रीया :-
- पुणे मेट्रोचा अधिकृत क्रमांक ९४२०१०१९९० वर ‘हाय’ मेसेज पाठवा
- तुम्ही मेसे पाठल्यानंतर त्याच्या रिप्लायमध्ये एक क्यूर कोड तुम्हाला पाठवण्यात येते.
- तसेच तुमच्या नंबरवर तुम्हाला एक युआरएल पाठवण्यात येते. त्यावर क्लीक केल्यास तुम्ही तुमचं तिकीट सहज बुक करु शकता. (हे ही वाचा:- Twitter Subscription: आयफोन युजर्सला आता ट्वीटर वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, 'ट्विटर ब्लू'साठी iOS वापरकर्त्यांना $8/महिना सबस्क्रिप्शन चार्ज)
किंवा तुमच्या नंबरवर पाठवण्यात आलेला क्यूर कोड स्कॅन (QR Code Scan) करत देखील तुम्ही मेट्रो तिकीट बुक करु शकता. तरी नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, पुणे मेट्रोने (Pune Metro) पुणे मेट्रो मोबाइल अॅप (Pune Metro Mobile App) विकसित केले आहे. जे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड (Android) आणि आयफोनवर (iPhone) देखील वापरु शकता. तसेच या अपवर तुम्ही नेट बॅंकीग (Net Banking),यूपीआय (UPI) किंवा मोबाईल पेमेंट (Mobile Payment) अपच्या माध्यमातून पुणे मेट्रोचं तिकीट बुक करु शकता.