Twitter Video Update: आता ट्वीटरचं ही टिकटॉक होणार, जाणून घ्या ट्वीटरचा नवा व्हिडीओ अपडेट
इमर्सिव व्यूइंग आणि ईजी डिस्कवरी.
केंद्र सरकारकडून (Central Government) दोन वर्षापूर्वी टिकटॉक (TikTok) या बहूचर्चित चायनिज अॅपवर (Chinese Application) बंदी घालण्यात आली आणि भारतात टिकटॉक (TikTok Ban In India) वापरण सक्तीचं झालं. टिकटॉक हा एक व्हिडीओ प्लॉटफॉर्म (Video Platform) होता त्यावर व्हर्टिकल व्हिडीओ (Vertical Video) साकराता यायचे. पण भारतात टिकटॉकच्या बंदी (TikTok Ban) नंतर प्रत्येक अपचं टिकटॉक झालं आहे. म्हणजे काही महिन्यापूर्वीच इंस्टाग्रामकडून (Instagram) इंस्टाग्राम रील (Instagram Reel) हा व्हिडीओ फॉरमेट अपडेट (Video Format Update) आणण्यात आला. त्यानंतर यूट्यूबवर (YouTube) पण यूट्यूब शॉट्स या एक नवा अडेट लॉंच (Launch) करण्यात आला. आता यूट्यूब, इंस्टाग्रामच्या पावलावर पाऊल टाकत ट्वीटर देखील नवा व्हरटिकल व्हिडीओ अपडेट (Vertical Video Update) घेवून येत आहे. तरी ट्वीटर हा बहूदा फॉर्मल समजण्यात येणाऱ्या सोशल मिडीया प्लॉटफॉर्मला (Social Media Platform) आता या नव्या अपडेट नंतर कॉज्यूअल (Casual) रुप येण्याची चर्चा आहे.
ट्वीटरने युजर्ससाठी (Twitter User) दोन नवीन अपडेट्स (Updates) आणल्या आहेत. इमर्सिव व्यूइंग आणि ईजी डिस्कवरी. या नवीन अपडेट संबंधी ट्वीटरनं एक ब्लॉग (Blog) प्रकाशित केला आहे ज्यात त्याने म्हटले आहे की 'व्हीडिओ सध्या सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक (Indivisible Part) झाला आहे. जे घडतेय ते शोधणं आणि दाखवणं सोपं करण्यासाठी, आम्ही ट्वीटरवर युजर्सला (Twitter User) व्हीडिओचा एक्सपीरियन्स (Video Experience) चांगला व्हावा यासाठी दोन नवीन फिचर्स इमर्सिव व्यूइंग आणि ईजी डिस्कवरी (Immersive viewing and easy discovery) आणत आहोत.' तरी हे व्हिडीओ व्हरटीकल फॉर्ममध्ये उपलब्ध असणार आहे. (हे ही वाचा:- UPSC Mobile App: लोकसेवा आयोगाकडून मोबाइल अॅप लॉंच; परिक्षा, पदभरती संदर्भात मिळणार एका क्लीकवर अपडेट)
इमर्सिव मीडिया व्यूअर येणाऱ्या काही दिवसांत आयओएस (IOS) आणि अनरॉइडवर (Android) फक्त इंग्रज (English) भाषेत लागू होणार आहे. त्यानंतर काही कालावधीनंतर हा नवा फिचर सर्वच भाषांसाठी वापरात येऊ शकतं. नवीन व्हीडिओ अपडेट (Video Update) सोबत युजर्सला आता सहजपणे आपल्या आवडीचे ट्वीट्स (Tweets) आणि ट्रेंड (Trends) पाहाता येतील. त्यासोबतच सहजपणे आवडीचे व्हिडीओ शोधता (Video Search) येतील. ट्वीटरवर शेअर (Share) करण्यात आलेले लोकप्रिय व्हीडिओ शोधण्यासाठी युजर्स एक्सप्लोर टॅबवर जाऊ शकतो. सध्या या नव्या अपडेटची ट्रायल सुरु असण्याची माहिती ट्वीटरने दिली आहे.