IPL Auction 2025 Live

E-GRAM SWARAJ: नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेलं ई- ग्राम स्वराज पोर्टल नेमकं काय काम करणार, कसे कराल डाउनलोड? जाणून घ्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी सुरु केलेल्या ई- ग्राम स्वराज पोर्टल (E-Gram Swaraj Portal) विषयी सविस्तर माहिती आणी हे पोर्टल कसे डाउनलोड करावे हे जाणुन घ्या.

Narendra Modi (Photo Credits: ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज राष्ट्रीय पंचायती राज दिवसाच्या (Rashtriya Panchyati Raj Diwas)  निमित्ताने देशातील सर्व सरपंचांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मोदींनी दोन नव्या प्रकल्पांचे लोकार्पण केले आहे. यामधील एक म्हणजे ई- ग्राम स्वराज पोर्टल (E-Gram Swaraj Portal). ग्रामपंचातीच्या कामात पारदर्शकता यावी, गावातील आणि शहरातील जनतेला या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतीतील विकास कामे, कामाचा वेग, फंड, इत्यादीविषयी माहिती मिळावी यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे असे मोदींनी पोर्टल लाँच करताना सांगितले आहे, यापुढे कोणत्याही ग्रामपंचायतींची माहिती मिळवायची असल्यास दहा वेगवेगळ्या साईट्सवर जाण्याची गरज पडणार नाही तर सरपंचाच्या नावापासून ते गावातील सर्व कामांपर्यंतची महत्वाची माहिती या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. या पोर्टल विषयी सविस्तर माहिती जाणून घ्या..

काय आहे E-Gram Swaraj Portal

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया प्रकल्पातील हे एक मोठे पाऊल असणार आहे. गावांना डिजिटली साक्षर करण्यासाठी या पोर्टलची मदत होणार आहे. ईग्रामस्वराज पोर्टल भारतात पंचायती राज मंत्रालयाने सुरू केले असून हा उपक्रम जनतेला गावातील कामांची सविस्तर माहिती देणार आहे. प्रत्येक गावाची GPDPs म्हणजेच विकासकामांचा आराखडा, या कामाचा प्रगती अहवाल, आर्थिक माहिती (खर्च आणि मिळकत), ग्रामपंचायत प्रोफाइल, आर्थिक आणि प्रत्यक्ष कामाची ग्रामपंचायत प्रोफाइल, गावची सरकारी कागदपत्रे ही सर्व माहिती या पोर्टल वर उपलब्ध असणार आहे.

E-Gram Swaraj Portal डाउनलोड कसे कराल

-Google Play Store किंवा अ‍ॅप स्टोअर उघडा

- 'ई ग्राम स्वराज' सर्च करा

- ऍप वर टॅप करा आणि ते डाउनलोड करा.

- फोनमध्ये इन्स्टॉल करा पर्याय निवडा.

पहा नरेंद्र मोदी आणि सरपंचांचा संवाद

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिनाचे औचित्य साधत सरपंचांशी संवाद साधला. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात गावांनी आत्मनिर्भर व्हावे दो गज दुरी म्हणजेच दोन हातांचे अंतर राखून राहावे, कोरोना संकटकाळात ग्रामपंचायतींनी सोप्प्या आणि महत्वाच्या पद्धतीने देशाला दिशा दाखवली आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.