Microsoft Surface Go 2 आणि Surface Book 3 टॅबलेट भारतात लाँच, वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
हे दोन्ही टॅबलेट्स बॅटरी लाईफ (Battery Life) आणि व्ह्यूविंगच्या (Viewing) बाबतीत एकदम जबरदस्त आहेत. याशिवाय इंटेलच्या 10th जनरेशन आइस लेक कोर i5 आणि i7 प्रोसेसरने सुसज्ज आहेत.
मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीने आपले दोन जबरदस्त टॅबलेट्स भारतात लाँच केले आहेत. Microsoft Surface Go 2 आणि Surface Book 3 अशी यांची नावे असून हा 2 इन 1 लॅपटॉप (2 in 1 Laptop) भारतात लाँच झाला आहे. या टॅबलेट्सच्या (Tablet) उपलब्धतेविषयी अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र हे दोन्ही टॅबलेट्स बॅटरी लाईफ (Battery Life) आणि व्ह्यूविंगच्या (Viewing) बाबतीत एकदम जबरदस्त आहेत. याशिवाय इंटेलच्या 10th जनरेशन आइस लेक कोर i5 आणि i7 प्रोसेसरने सुसज्ज आहेत.
Microsoft Surface Go 2 ची किंमत 47,599 रुपये आहे. Surface Book 3 च्या 8GB रॅम+256GB स्टोरेजची किंमत 1,56,299 रुपये आहे. तर 16GB रॅम+256GB स्टोरेजची किंमत 1,95,899 रुपये इतकी आहे. तर 32GB+512GB ची किंमत 2,37,199 रुपये आहे. हेदेखील वाचा- Google Map चे नवे अपडेट, ट्रेन-बस आणि सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीचे मिळणार Live Updates
Microsoft Surface Go 2 टॅबलेटमध्ये 10.5 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. त्याशिवाय यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन दिले गेले आहे. यात Intel Pentium Gold 4425Y आणि 8th- Gen Intel Core M3 विकल्प दिला गेला आहे. त्याशिवाय यात 5MP फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 8MP रियर फेसिंग ऑटोफोकस कॅमेरा 1080p एचडी रेकॉर्डिंग सपोर्ट दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय 6, ब्लूटुथ 5.0, ई-सिम सपोर्ट, सिंगल नॅनो-सिम ट्रे, GPS, A-GPS, USB-Type C पोर्ट दिला आहे.
Microsoft Surface Book 3 मध्ये 13 इंच आणि 15 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. यात क्वाड कोर 10th-Gen Intel Core i5-1035G7 आणि i7-1065G7 प्रोसेसरने देण्यात आले आहे. यात 5MP चा फ्रंट कॅमेरा आणि 8MP चा रियर कॅमेरा, फार-फिल्ड स्टीरियो मायक्रोफोन आणि फुल बॅकलिट कीबोर्ड दिला आहे.
तसेच 13 इंचाच्या Microsoft Surface Book 3 मध्ये 15.5 तासांची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. तर 15 इंचाच्या व्हर्जनमध्ये 17.5 इंचाची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वायफाय 6, ब्लूटुथ 5.0, युएसबी 3.1 Gen2 टाइप ए पोर्ट्स देण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)