Micromax In 1b ची प्री-बुकिंग आजपासून सुरु, 24 डिसेंबरला होणार पहिला सेल, जाणून याची खास वैशिष्ट्ये
स्मार्टफोनच्या 2GB+32GB स्टोरेजची (Storage) किंमत 6,999 रुपये असून 4GB+64GB स्टोरेजची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी भारतात लाँच झालेला Micromax In 1b स्मार्टफोनची आजपासून प्री-बुकिंग सुरु होणार आहे. आज दुपारी 12 वाजता या स्मार्टफोनची प्री बुकिंग ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या (Flipkart) Big Diwali Sale मध्ये होणार आहे. तर 24 नोव्हेंबरपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहे. आणि मुख्य म्हणजे याची किंमतही सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये असेल इतकी आहे. या स्मार्टफोनच्या 2GB+32GB स्टोरेजची (Storage) किंमत 6,999 रुपये असून 4GB+64GB स्टोरेजची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Micromax In 1b स्मार्टफोन निळा, हिरवा आणि जांभळ्या रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले (Display) विषयी बोलायचे झाले तर यात 6.52 इंचाची एचडी+ डिस्प्ले देण्यात आली आहे. हा अॅनड्रॉईड 10 ओएसवर चालतो. हा MediaTek Helio G35 चिपसेटसह येतो. मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने याचे स्टोरेज तुम्ही वाढवूही शकता.हेदेखील वाचा- Samsung Galaxy M21s: सॅमसंग गॅलेक्सी एम 21 एस स्मार्टफोन लॉन्च; काय आहेत खासियत? घ्या जाणून
या स्मार्टफोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा (Camera) आणि 2MP चा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. यात व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या 5000mAh ची बॅटरी (Battery) देण्यात आला आहे. थोडक्यात उत्कृष्ट कॅमेरा, स्टोरेज आणि बॅटरी फिचर्स खूपच जबरदस्त आहेत. त्यामुळे आज तुम्ही हा स्मार्टफोन प्री-ऑर्डर बुक करु शकता.
दरम्यान Micromax In Note 1 सुद्धा लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 6.67 इंचाचा पंच होल एचडीप्लस डिस्प्ले दिला जाणार आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरचा वापर केला गेला आहे. फोन अॅन्ड्रॉइड 10 बेस्ड स्टॉक वर्जन ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमच्या रियर पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा असणार आहे. तर 5MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा सपोर्ट मिळणार आहे. त्याचसोबत 2MP मॅक्रो लेन्स दिली गेली आहे. तर डेप्थ सेंसर म्हणून 2MP चा वापर केला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट पॅनलवर 16MP चा कॅमेरा सेंसर मिळणार आहे. पॉवर बॅकबद्दल बोलायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळणार असून ती 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.