Micromax In 1 बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च; 26 मार्चपासून विक्रीस उपलब्ध
हा स्मार्टफोन 26 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्स (Micromax) ने नवा मायक्रोमॅक्स इन 1 (Micromax In 1) हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 26 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट (Flipkart) आणि मायक्रोमॅक्स वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- 4 जीबी रॅम+ 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6 जीबी रॅम +128 जीबी इंटरनल स्टोरेज. स्मार्टफोनच्या बेसिक वेरिएंटची किंमत 10,499 रुपये इतकी असेल तर टॉप इन्ड वेरिएंटची किंमत 11,999 रुपये इतकी आहे. 4GB + 64GB मॉडलची किंमत 9,999 रुपये असून 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 11,499 रुपये इतकी आहे. (Micromax In 1: कमी किंमतीत मिळणार धमाकेदार फिचर्स!)
या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले 2400x1080 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. तर MediaTek Helio G80 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.
ट्विट:
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह देण्यात आला असून 48MP चा मेन कॅमेरा, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॉक्रो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हा बजेट स्मार्टफोन अॅनरॉईड 10 या ऑपरेटिंग स्टिटमवर काम करत असून त्यात 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्गिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे. कनेक्टीव्हीटीसाठी यात ड्युअल बँड वाय-फाय, 4जी, dual-VoLTE, dual-VoWiFi, Bluetooth 5.0, GPS आणि a USB Type-C port देण्यात आला आहे. बोर्डवरील सेन्सरमध्ये एम्बियंट लाइट सेन्सर, कंपास, जायरोस्कोप, गुरुत्व सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश आहे.