Upcoming Smartphones: नव्या फिचर्ससह 'या' कंपन्यांचे मोबाईल भारतीय बाजारात येण्यास सज्ज, जाणून घ्या कधी होणार लॉंच
स्मार्टफोन अशी गोष्ट आहे जी आता प्रत्येक माणसांकडे पहायला मिळते. मोबाईल आता आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. हि गोष्ट लक्षात घेऊन मोबाईल कंपन्याही प्रत्येक महिन्यात नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणतात. ते ही नवीन फिचर्स आणि नवीन अपडेटसह. आधीच्या फोनमधील फिचर्सपेक्षाही नवीन फिचर्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून भारतीय बाजारात यायला सज्ज झाले आहेत. जर आपण या महिन्यात एक चांगला स्मार्टफोन खरेदी करत असाल तर या महिन्यात अनेक मोबाईल कंपन्या त्यांचे स्मार्टफोन बाजारात आणणार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल यात चांगला मोबाईल कोणता असेल. तर आम्ही तुमच्यासाठी यातील काही मोबाईलची यादी केली आहे. यामुळे तुम्हाला नक्कीच योग्य असा मोबाईल निवडायला मदत होईल.
जुलै 2021 मध्ये लॉंच होणारे मोबाईल...
- रेडमी 10 सिरीज
जुलै महिन्यात रेडमी 10 सिरीज भारतॉ बाजारात येणार आहे. अशी माहिती शामोईने दिली आहे. रेडमी 9 पेक्षाही रेडमी 10 सिरीज ही नवीन फिचर्सने परिपूर्ण आहे. ग्राहकांचं लक्ष वेधण्यासाठी शामोईने याच्या किंमती हि सामान्यांना परवडेल अशी ठेवली आहे. हे मोबाईल 10 हजारांपर्यत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या सिरीजमध्ये शाओमी रेडमी 10 ए आणि रेडमी 10 प्रो हे मोबाईल बाजारात येण्याची शक्यता आहे. या मोबाईलच्या फिचर्सबद्दल सांगायचे झाले तर यात एमआययूआय ऑपरेटिंग सिस्टमसह फुल एचडी डिस्प्ले दिला जाणार आहे.
2. पोको एफ 3 जीटी
पोको फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आता प्रतिक्षा संपणार आहे. पोकोचा आता एफ 3 जीटी हा नवीन मोबाईल बाजारात आणत आहे. हा मोबाईल गेमिंगसाठी चांगला असल्याचे बोलले जात आहे. गेमिंसाठी असणारे फिचर्स यात समाविष्ट केले आहेत. हा मोबाईल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यात रेडमी 40 मोबाईलप्रमाणे फिचर्स असणार आहेत.
3. रिएलमी जीटी
कमी वेळात ग्राहकांमध्ये आपली छाप पाडणारी रिएलमी कंपनीचा रिएलमी जॉटी हा मोबाईल बाजारात विक्रीसाठी येत आहे. रिएलमीच्या इतर मोबाईल प्रमाणेच या मोबाईलमध्ये ही दमदार फिचर्स आहेत. यात 6.43 इंचाचा फुलएचडी एएमओएलईडी डिस्प्लेसह कॉर्निंग गोरीला ग्लास वापरला आहे. यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 39,900 असणार आहे. तर 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 53,200 पर्यंत असणार आहे.
4. विवो एस 10
मोबाईल कंपन्यांमध्ये प्रसिद्ध असलेली विवो कंपनीही एस 10 हा मोबाईल नवीन फिचर्ससह ग्राहकांसाठी उपलब्ध करत आहे. या मोबाईलमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा तसेच 44 वॅटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट सारखे फिचर्स दिसणार आहेत. जुलै महिन्याच्या अखेरी किंवा ऑगस्टमध्ये हा मोबाईल बाजारात येण्याची शक्यता आहे.
5. वनप्लस नॉर्ड 2
अत्यंत कमी वेळात जास्त पंसतीस आलेला वनप्लस या कंपनीचा नॉर्ड मोबाईल आता नवीन स्वरूपात उपलब्ध होणार आहे. वनप्लस त्याचा पार्ट 2 बाजारात विक्रीसाठी आणत असल्याची माहिती वनप्लसने दिली आहे. या मोबाईलची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मात्र आता याची प्रतिक्षा संपली आहे. या मोबाईलमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप दिला जाईल. ह्या मोबाईलची रॅम 8 जीबी असण्याची शक्यता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)