Jio Glass: रिलायंसच्या 43व्या वार्षिक सभेमध्ये लॉन्च झालेल्या या मिक्स्ड रिअ‍ॅलिटी स्मार्ट चष्माची जाणून घ्या वैशिष्ट्य

ज्याच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंग (Video Calling) ते शैक्षणिक अभ्यास अशा अनेक गोष्टी करता येणार आहे.

Gio Glass | Photo Credits: Twitter / @aastha_singh39

रिलायंस कंपनी दरवर्षी त्यांच्या वार्षिक सभेमध्ये एक प्रॉडक्ट लॉन्च करते. यंदा RIL AGM 2020 मध्ये रिलायंस कंपनी कडून जिओ ग्लासेस (Jio Glass) लॉन्च करण्यात आले आहेत. दरम्यान यंदा कोरोना संकट काळात ही सभा व्हर्च्युअली पार पडत आहे. यामध्येच रिलायंस कडून जिओ ग्लासचा डेमो देखील देण्यात आला आहे. जिओ ग्लास एक मिक्स्ड रिअ‍ॅलिटी (Mixed Reality Cloud in Real-Time‌) स्मार्ट ग्लास आहेत. ज्याच्या मदतीने व्हिडिओ कॉलिंग (Video Calling) ते शैक्षणिक अभ्यास अशा अनेक गोष्टी करता येणार आहे. जिओ ग्लासमध्ये व्हर्च्युअल असिस्टंटचादेखील सपोर्ट असेल. दरम्यान जिओ ग्लास हे प्रामुख्याने होलोग्राम कंटेन्ट साठी बाजारात आणला आहे. RIL AGM 2020: जिओ प्लॅटफॉर्म मध्ये आता Google ची देखील गुंतवणूक; 5G solution, JioGlass सह या मोठ्या घोषणा

जिओ ग्लास ची वैशिष्ट्यं

Jio Glass (Photo Credits: Reliance AGM 2020)

आजच्या 43व्या सभेमध्ये रिलायंस कडून अन्य देखील मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये जिओची गूगल सोबत असलेली पार्टनरशीप, व्हॉट्सअ‍ॅप सोबत येऊन लॉन्च केला जाणार जिओ मार्ट हा प्रकल्प आहे. यासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी जिओ टीव्ही प्लसची घोषणा केली आहे. दरम्यान 5जी देखील भारतामध्ये स्वदेशी स्वरूपात घेऊन येण्याचा मानस व्यक्त केला आहे.