Iphone 16 Series: ॲपल iphone 16 मध्ये मिळणार AI फिचर्सचं अपडेट व्हर्जन; लवकरच बाजारात
iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये अनुक्रम 6.1 इंच आणि 6.7 इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
भारतात आयफोन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अॅप्पलकडून आयफोन 16 सीरीज पुढील महिन्यात लाँच करण्यात येत आहे. अॅप्पलच्या या 16 सीरीजमधील सर्वच मॉडेलची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. आयफोनच्या (iphone) नवीन सीरीजची ग्राहक आतुरतेनं वाट पाहत असतात. गतवर्षी आयफोन 15 ची सीरीजी लाँच झाल्यानंतर त्याच्या खरेदीसाठीही स्मार्टफोन (Smartphone) ग्राहकांची झुंबड उडाली होती. आता, आयफोन 16 सीरीजची वाट ग्राहकांकडून पाहिली जात आहे. iPhone 16 आणि iPhone 16 Pro चा डमी लीक झाला होते. (हेही वाचा -Moto G45 5G Launched in India: Snapdragon 6s Gen 3 आणि 50MP कॅमेऱ्यासह 5G स्मार्टफोन, किंमत, फीचर्स आणि इतर तपशील, घ्या जाणून)
आहे. या सीरीजचे सर्वच मॉडेल मेड इन इंडिया असण्याचीही शक्यता आहे. आयफोन 16 सीरीजचे 10 सप्टेंबर रोजी लाँचिंग होत आहे. अमेरिकेत आयफोन 16 ची लाँचिंग प्राईज 799 डॉलर एवढी असू शकते. तर, भारतात आयफोन 16 79,900 रुपयांच्या प्राईजने लाँच होऊ शकतो. तसेच आयफोन 16 Plus ची ग्लोबल किंमत 899 डॉलर एवढी असण्याची शक्यता आहे. या वर्षी लॉन्च होत असलेल्या अॅप्पल च्या iPhone 16 सीरीज मध्ये iOS 18 ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसेच, Apple Intelligence चे इंटिग्रेशन भी पाहायला मिळेल. विशेष म्हणजे iPhone 16 सीरीजच्या डिजाइनमध्येही कंपनीकडून नव्याने अपग्रेड केलं जाऊ शकतं.
16 सीरीजमधील आयफोनचा डिस्प्ले iPhone 15 च्या तुलनेत मोठा असेल. iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये अनुक्रम 6.1 इंच आणि 6.7 इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तर, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये अनुक्रम 6.3 इंच आणि 6.9 इंच डिस्प्ले मिळू शकतो. या सीरीजमधील iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max चे डिझाइन गतवर्षी लाँच झालेल्या मॉडेलसारखेच असण्याची शक्यता आहे.